शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एमयूटीपी-३च्या प्रकल्पांना निधी मिळणार?

By admin | Updated: May 17, 2016 05:42 IST

एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमयूटीपी अंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्प राबविले जात आहेत.

मुंबई : एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमयूटीपी अंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्प राबविले जात आहेत. सध्या एमयूटीपी-३मधील तीन प्रकल्प सुरू करण्यावर एमआरव्हीसीकडून भर देण्यात आला आहे. त्यासाठी निधीची गरज भासणार असून, वर्ल्ड बँकेशी बोलणी सुरू केली असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली. वर्ल्ड बँकेनेही निधी देण्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. एमयूटीपी-१ प्रकल्प एमआरव्हीसीकडून पूर्ण करण्यात आल्यानंतर एमयूटीपी-२मधील काही प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. हे प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एमयूटीपी-२मधील प्रकल्प पूर्ण करताच एमयूटीपी-३मधील प्रकल्पांना त्वरित सुरुवात करण्यात येईल. या प्रकल्पांचा खर्च हा जवळपास १0 हजार कोटी रुपये असून, त्याला वर्ल्ड बँक किती निधी देणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यासाठीच एमआरव्हीसीकडून वर्ल्ड बँकेच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. वर्ल्ड बँकेकडून एमयूटीपी-३मधील प्रकल्पांच्या खर्चाची माहिती घेण्यात आली. ही माहिती घेतल्यानंतर खर्चाचा अंतिम अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र निधी देण्याबाबत वर्ल्ड बँक सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. एमयूटीपी-३मध्ये विरार-डहाणू चौपदरीकरण, पनवेल-कर्जत मार्गाचे दुहेरीकरण आदी प्रकल्पांचा समावेश आहे.