शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग्ज तपासण्यास नेते नियुक्ती कराल का?

By admin | Updated: November 21, 2015 02:57 IST

बेकायदेशीर होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर्सवर आळा घालण्यासाठी महापालिकांच्या प्रत्येक प्रभागामध्ये एका स्थानिक नेत्याची नियुक्ती कराल का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने

मुंबई : बेकायदेशीर होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर्सवर आळा घालण्यासाठी महापालिकांच्या प्रत्येक प्रभागामध्ये एका स्थानिक नेत्याची नियुक्ती कराल का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांकडे केली. संबंधित नेता त्या प्रभागामध्ये बेकायदेशीर होर्डिंग लावण्यात आल्यास जबाबदार राहील आणि त्याच्यावरच अवमानाची कारवाई करण्यात येईल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.बेकायदेशीर होर्डिंग, बॅनर आणि पोस्टरवर संबंधित विभाग कारवाई करत नसल्याने सातारा येथील सुस्वराज्य फाऊंडेशन आणि मुंबईच्या जनहित मंच या एनजीओंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीवेळी शेलार यांचे वकील विश्वास पाटील यांनी होर्डिंगचे फोटो पाहिल्यानंतर तत्काळ चौकशीला सुरुवात केल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘हे होर्डिंग लावणारे भाजपपैकी कोणीच नसल्याचे चौकशीत समजले आहे. मला या याचिकेत तक्रारदार व्हायचे आहे,’ असे अ‍ॅड. पाटील यांनी शेलार यांच्यातर्फे खंडपीठाला सांगितले. ‘होर्डिंगवर होर्डिंग लावणाऱ्या लोकांची नावे आहेत. ते तुम्हाला माहीत आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार. आता तुम्ही सांगत आहत की ते काँग्रेसचे आहेत. आम्हाला होर्डिंग लावणाऱ्या लोकांची नावे आणि पत्ता द्या, आम्ही त्यांना अवमानची नोटीस बजावू,’ असे खंडपीठाने म्हटले.अ‍ॅड. पाटील यांनी कार्यकर्त्यांपर्यंत उच्च न्यायालयाचे आदेश पोहोचवण्यासाठी आणखी थोडी मुदत देण्याची विनंती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने आणखी किती वेळ द्यायचा, अशी विचारणा भाजपकडे केली. ‘जर सामान्य नागरिकाने होर्डिंगवर काळी शाई फेकण्याचा विचार केला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही. प्रत्येक नागरिकाला तसे करण्याचा अधिकार आहे,’ असे न्या. पटेल यांनी म्हटले. राज ठाकरेंतर्फे ज्येष्ठ वकील व्ही. ए. थोरात यांनी आपला पक्ष बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यास पाठिंबा देत आहे. परंतु पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे कर्मचारी नसल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने म्हटले की, न्यायालयाने कारवाई करण्यास सुरुवात केली की सगळ्यांना समजले. यापुढे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यायला गेले, तरी आम्ही महापालिकेला त्यांना आधी न्यायालयाकडून परवानगी मागण्यास सांगा, असे आदेश देणार आहोत.अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी अद्याप तीनच राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयाला हमी दिल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणली. उर्वरित पक्षांचाही विचार केला जाईल, असे आश्वासन खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी २४ प्रभागांमधील होर्डिंग हटवणाऱ्या पथकाबरोबर किमान दोन हवालदार देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती खंडपीठाला केली. त्याशिवाय महापालिकेने एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत ८५९८ होर्डिंगवर कारवाई केल्याची माहितीही खंडपीठाला दिली. या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी आहे. यावेळी राज आणि शेलार यांना संबंधित कार्यकर्त्यांचे नावे आणि पत्ता देण्याचे निर्देश दिले.