शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळे करणा-यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणार का? उद्धव यांचा भाजपाला प्रश्न

By admin | Updated: October 30, 2014 11:51 IST

ज्या विदर्भात राष्ट्रवादीवाल्यांनी जलसिंचनाचे मोठे घोटाळे केले त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - ज्या विदर्भात राष्ट्रवादीवाल्यांनी जलसिंचनाचे मोठे घोटाळे केले त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय असा सवाल उध्व ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच सेनेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबद्दल नाराजी दर्शवत भाजपाला टोमणेही मारले आहेत.
अल्पमतातले सरकार आम्ही बनवू आणि चालवून दाखवू ही भूमिका सध्या ठीक आहे, पण असे सरकार चालवून सत्तेचा भोग घेणे घटनाविरोधी आहे असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून नाराजी व्यक्त करत सौभाग्यवतीप्रमाणे सरकारचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व कॉंग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला असताना ज्यांनी विदर्भात जलसिंचन घोटाळा केला त्यांच्याच पाठिंब्यावर सरकार चालवणार का असा खडा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. सत्ताकारण सतीसावित्रीचे नसले तरी अगदीच ऐर्‍यागैर्‍याच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे राज्य चालू नये असा इशाराही भाजपाला देण्यात आला आहे. भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे गाडण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आहे, पण त्याच राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी पाठिंब्याचा खेळ करून दूध नासवण्याचा प्रयत्न केला. हे नासके दूध नव्या सरकारला बाळसे देणार असेल तर हा विषय फार न लांबवता इथेच पूर्णविराम दिलेला बरा असेही लेखात म्हटले आहे. मात्र राज्य स्थिर असावे व स्थिर राज्याचा मुख्यमंत्री स्थिर असावा, अशी अपेक्षा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असल्याचे सांगत लेखातून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे. विदर्भाच्या मनातील मागासलेपणाची जळमटे दूर करण्याची जबाबदारी फडणवीस यांची आहे. विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राने पोटाशी कवटाळला आहे व रायगडावरून त्याच्यावर पुष्पवृष्टी होत आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी हे सदैव स्मरणात ठेवावे असे सांगत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही मोकळ्या मनाने स्वागत करीत असल्याचेही लेखात नमूद करण्यात आले आहे.