शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

हक्कांसाठी लढूनच न्याय मिळेल - वैष्णव

By admin | Updated: January 15, 2017 01:26 IST

संपूर्ण भारतभर पसरलेल्या भटक्या विमुक्तांच्या भाळी युगानयुगे केवळ उपेक्षा आली आहे. प्रतिष्ठित समाजाच्या तथाकथित ठेकेदारांनी भटक्या विमुक्त जातीजमातीच्या लक्षावधी लोकांवर बहिष्कार

नाशिक : संपूर्ण भारतभर पसरलेल्या भटक्या विमुक्तांच्या भाळी युगानयुगे केवळ उपेक्षा आली आहे. प्रतिष्ठित समाजाच्या तथाकथित ठेकेदारांनी भटक्या विमुक्त जातीजमातीच्या लक्षावधी लोकांवर बहिष्कार टाकून मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे. समाजातील शिक्षण घेऊन सावरू पाहणारी नवी पिढी आता साहित्याच्या माध्यमातून आपल्या वेदना व्यक्त करू लागली आहे. हे साहित्य प्रखर वास्तववादी आणि ज्वलंत असल्यामुळे वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून, अशा साहित्याच्या माध्यमातून समाजाने आपल्या हक्कांसाठी लढा उभारला तरच न्याय मिळेल, असे प्र्रतिपादन भटक्या विमुक्तांच्या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नाईक साहित्यनगरीत दहाव्या राज्यस्तरीय भटक्या विमुक्त साहित्य संमेलनात उद्घाटक प्रा. सुनीता पवार यांनी पुरोगामित्वाचे पांघरून समाजहिताचे ढोंग करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, समाजात एक ते दोन टक्के लोक शिक्षण घेऊन प्रगत झाले आहे. त्यांनी समाजाकडे डोळसपणे पाहून विकासाचा विचार करतानाच वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत संधी पोहोचविण्याची गरज आहे. आपल्या प्रगतीसाठी महात्मा फुले यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे आपणही समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. रघुनाथ राठोड यांनी संमेलनाचा उद्देश व भूमिका सष्ट केली. स्वागताध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी मान्यवरांचा सत्कार केला. (प्रतिनिधी) महत्त्वाचे ठरावविमुक्त जाती, भटक्या जमातींना स्वतंत्र आरक्षणाची व्यवस्था करणेबाबत कायदा करण्यासाठी राज्याने शिफारस करावी.अंदाजपत्रकात लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणे.स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून जमातीच्याच मंत्र्याची नेमणूक करणे.जातनिहाय गणना करून प्राप्त अनुशेष पूर्ण करणे.आरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करणे.निवासी उच्च शिक्षणाचा कृती आराखडा स्वीकारून अंदाजपत्रकीय तरतूद करून शिक्षणाची व्यवस्था करणे.पहिल्यांदाच सरकारी अनुदान महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण, विकास व संशोधन संस्थेतर्फे आतापर्यंत ९ वेळा साहित्य संमेलन झाले. त्याचा खर्च संस्थेलाच उचलावा लागत होता.यंदा प्रथमच शासनाच्या साहित्य व संस्कृ ती मंडळाने संमेलनासाठी अनुदान दिल्याचे संमेलनअध्यक्षांनी सांगितले.