शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

नाट्य संमेलनाध्यक्षांनाही निधी मिळणार का?

By admin | Updated: January 22, 2016 00:55 IST

आजवर नाट्य संमेलनाध्यक्षांचे महत्त्व एका चौकटीपुरतेच मर्यादित राहिले आहे. नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पुष्टी देण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले

पुणे : आजवर नाट्य संमेलनाध्यक्षांचे महत्त्व एका चौकटीपुरतेच मर्यादित राहिले आहे. नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पुष्टी देण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाध्यक्षांनाही नाट्य क्षेत्रात योगदान देण्यासाठी निधी मिळणार का, अशी चर्चा साहित्य-नाट्य वर्तुळात सुरू आहे.पिंपरी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वच स्तरांवर उंची गाठून नवे पायंडे पाडले. सर्व माजी साहित्य संमेलनाध्यक्षांना मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक लाख रुपयांचा कृतज्ञता निधी देण्यात आला. या पार्श्वभूमीवर, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व माजी अध्यक्षांनाही निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणेनगरीत १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गंगाराम गव्हाणकर म्हणाले, ‘‘आपल्याकडील नाट्य परंपरा खूप समृद्ध आहे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने या परंपरेचे जतन होते. संमेलनात अध्यक्षांचा सन्मान केला जातो. त्या रंगकर्मीने दिलेल्या योगदानामुळे मिळालेला हा सन्मान असतो. अध्यक्षाला निधी मिळाल्यास तो पुढील वर्षभरात अनेक अभिनव उपक्रम राबवून रंगभूमीच्या परंपरेला समृद्ध करू शकतो व तरुणांमध्ये अभिरुची निर्माण करू शकतो. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाला वर्षभरासाठी एक ओळखपत्र मिळावे, अशी मागणीही मी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. ’’फय्याज शेख म्हणाल्या, ‘‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच माजी अध्यक्षांना निधी मिळावा, असे माझे मत आहे. आमच्या पिढीच्या अनुभवाचा नवीन पिढीला उपयोग व्हावा, यासाठी खूप काही करावेसे वाटते; मात्र निधीअभावी मर्यादा येतात. नाट्य परिषदेने निधीचा प्रस्ताव संयोजकांसमोर मांडल्यास त्याचा विचार होऊ शकतो. नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद किमान दोन वर्षांसाठी असावे, असेही मला वाटते.’’नाट्य परिषदेचे दीपक करंजीकर म्हणाले, ‘‘सरकारकडून नाट्य संमेलनासाठी मिळणारा निधीच अपुरा असतो. हा निधी संयोजकांतर्फे दिला जाणार असेल, तर उत्तम पायंडा पडू शकतो. ’’(प्रतिनिधी)संमेलनात व्हावा भाषाभगिनींचा मिलाफ!प्रत्येक भाषेची क्षितिजे विस्तारली आहेत. भाषांमध्ये देवाण-घेवाण झाल्यास संस्कृतीचे जतन होईल, असे मत जावेद अख्तर यांनी साहित्य संमेलनात मांडले. याच धर्तीवर नाट्य संमेलन मराठी भाषेपुरते मर्यादित न राहता, त्यात इतर भाषांच्या नाटकांचा, नाटक कलाकारांचा समावेश केला जावा. विविध प्रवाहांमधील नाटके या संमेलनाच्या निमित्ताने एकत्र यावीत, अशी अपेक्षा रंगकर्मींनी व्यक्त केली.रंगकर्मी, साहित्यिकांची सांगडनाट्य संमेलनामध्ये सर्वसमावेशकता येण्यासाठी साहित्यिकांनाही नाट्य परिषदेतर्फे आमंत्रणे गेली पाहिजेत. या संमेलनात सारस्वतांचा सन्मान झाला पाहिजे. बरेच साहित्यिक हे नाटककार असतात; त्याचप्रमाणे रंगकर्मीही उत्तम साहित्यनिर्मिती करतात. त्यामुळे नाट्य संमेलनात रंगकर्मी आणि साहित्यिक यांची सांगड घातली गेली पाहिजे, अशी अपेक्षा फय्याज यांनी व्यक्त केली.