शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत जन्म झाला म्हणून अध्यक्ष होणार का?

By admin | Updated: October 18, 2016 03:42 IST

एखादा लेखक डोंबिवलीला जन्माला आला म्हणून काय तो तेथील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणार का

डोंबिवली : एखादा लेखक डोंबिवलीला जन्माला आला म्हणून काय तो तेथील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणार का, असा प्रश्न करत डोंबिवलीला जन्माला येणाऱ्यांनी नंतर ठाण्याला पलायन केल्याची टीका जयप्रकाश घुमटकर यांनी सोमवारी केली. घुमटकर हेही संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. आगरी यूथ फोरमच्या कार्यालयाला भेट दिल्यावर ते बोलत होते. निमंत्रक संस्थेची मते मिळविण्यासाठी ही भेट नसल्याचा खुलासा त्यांनी केला. यापूर्वी प्रवीण दवणे आणि अक्षयकुमार काळे यांनी डोंबिवलीत साहित्यिक व आगरी यूथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अध्यक्षपदासाठी माझी कोणाशी स्पर्धा नाही. साहित्यिक हे बुद्धिजीवी असल्याने त्यांच्यात वाद अपेक्षित नाहीत, तरीही प्रत्येक साहित्य संमेलनात वाद होतात. वादामुळे संमेलने गाजतात. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, या मताचा मी आहे. निवडणुकीच्या रिंगणात माझे मित्र आहेत. मतांसाठी मी लॉबिंग केलेले नाही. ज्येष्ठ साहित्यिकांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने मी रिंगणात उतरलो. एखाद्या साहित्यिकाला ८० व्या वर्षी साहित्य संमेलनाध्यक्षपद मिळण्यापेक्षा त्याचे हातपाय हलतात तोवरच संधी मिळाली तर तो मायमराठीसाठी काही तरी काम करु शकतो, असे सांगत घुमटकर यांनी २ नोव्हेंबरपासून प्रचार सुरु करणार असल्याचे जाहीर केले.>भूमिका न घेणाऱ्या साहित्यिकांना टोला मराठी साहित्यात दहा वर्षात मरगळ आली आहे. ती दूर करण्याची गरज आहे. उरी हल्ला, काश्मीर प्रश्न यावर सध्या कोणी लिहित नाही. ‘मी गोलघुमट’ नावाने आत्मचरित्र लिहीले. ते आत्मप्रकटन आहे. गांधीजींच्या चरित्रानंतर असे लेखन झालेले नाही. माझ्या प्रखर मतांमुळे माझ्याविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारणे, मांसाहारी-शाकाहारी वाद, काश्मीर प्रश्नावर कोणी लिखाण केलेले नसले, तरी मी केलेले आहे, असा टोला त्यांनी स्पर्धेतील अन्य साहित्यिकांना लगावला. १९८१ साली चित्रपट काढण्यासाठी शेतजमीन विकली. मला त्यात अपयश आले. त्यानंतर एका चित्रपटात भूमिका केली. त्यातून आलेल्या अनुभवावर चित्रपट कसा काढावा, हे पुस्तक लिहिले. ते प्रचंड गाजले, हे त्यांनी निदर्शनास आणले.>महामंडळ पुण्यातच हवे : साहित्य संमेलनाचा खर्च आटोपशीर हवा. साहित्यिक हा मते विकत घ्यायला राजकारणी नाही. मराठी विद्यापीठ वर्ध्याऐवजी पुणे, मुंबई भागात हवे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुन्हा पुण्यात आणावे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच अनुमोदकांऐवजी एकच हवा, असे मुद्देही घुमटकर यांनी मांडले.