शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवा सुरू होणार ?

By admin | Updated: November 12, 2015 03:05 IST

शहरात विमानतळ साकारल्यानंतर आता येथून विमान सेवा सुरू होईल, अशी भाबडी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे.

नाशिक : शहरात विमानतळ साकारल्यानंतर आता येथून विमान सेवा सुरू होईल, अशी भाबडी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे. दोन-चार कंपन्यांनी सेवा सुरू केल्यानंतर एकदाची विमानसेवा सुरू झाल्याचे मानले जात होते. मात्र एकामागोमाग एक सर्व कंपन्यांना सेवा गुंडाळावी लागली.शासनाने आता नागरी विमान वाहतूक धोरणात केलेले बदल आणि त्या अनुषंगाने ‘एचएएल’ने विमानसेवेसाठी निविदा मागविल्यामुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नाशिकमधून हवाई सेवा सुरू होण्यासाठी वेळोवेळी उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. आधी नागरी विमानतळ व्हावे, ही अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण झाल्यानंतरदेखील हस्तांतर मग पोलीस बंदोबस्त, कर्मचाऱ्यांच्या वेळा आणि त्यांचा अतिरिक्त मेहनताना अशा अनेक अडचणींमुळे सर्वात आधी ‘मेहेर’ ही सी प्लेन कंपनी, तर नंतर नाशिकच्याच श्रीनिवास एअरलाइनने नाशिक आणि पुणे सेवा सुरू करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. सी प्लेन कंपनीने सुरू केलेली नाशिक-पुणे सेवा एका आठवड्यातच बंद पडली. तर कुंभमेळ्याच्या निमित्ताने मुंबई येथून नागरिकांना नाशिक येथे आणून तेथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी नेऊन पुन्हा नाशिकमार्गे मुंबईस नेण्याच्या सेवेस जेमतेम यश मिळाले. मात्र त्यानंतर ही सेवाही बंद पडली. एअर इंडियाने आता सेवा सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच श्रीनिवास एअरलाइननेही पुन्हा सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. तथापि, आता एचएएलने विमान सेवा सुरू करण्यासाठी निविदा मागविल्याने अनेक कंपन्या पुढे येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिककरांचे रखडलेले विमानोड्डाण पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)