शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक होणार ‘हायटेक’

By admin | Updated: October 29, 2014 00:34 IST

अत्याधुनिक शस्त्रासह अँन्ड्रॉईड मोबाईल फोनही मिळणार.

बुलडाणा : खाकी गणवेश आणि हातात काठी घेऊन जंगलाची सुरक्षा करणार्‍या वनरक्षकास हायटेक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिकारी आणि वृक्षतोड करणार्‍या टोळींचा ताकदीने सामना करण्यासाठी वनरक्षकाच्या हाती आता अत्याधुनिक शस्त्र आणि विशेष सॉफ्टवेअर असलेले अँन्ड्रॉईड फोन दिसू लागणार आहेत.वनपरिक्षेत्रात एखादी शिकार, वृक्षतोड किंवा आगीसारखी घटना घडल्यास संबंधित वन कर्मचारी घटनेचा पंचनामा करून, गुन्हा दाखल करतो. त्यानंतर तो रिपोर्ट टपालाद्वारे मुख्यालयातील वरिष्ठांकडे पाठविला जातो; मात्र या प्रक्रियेस किमान एक आठवड्याचा कालावधी लागतो. यामुळे बरेचदा वरिष्ठांना योग्य कारवाई करण्यास विलंब होतो. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध करणे कठीण होते. आता वन कर्मचारी जंगलात कोणतीही घटना घडल्यास त्याबाबतचा रिपोर्ट नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तत्काळ वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकणार आहे. याशिवाय अँन्ड्रॉईड मोबाईल फोनच्या माध्यमातून घटनेची छायाचित्रही वरिष्ठांकडे लगेच पाठविता येणार आहे. त्यामुळे वरिष्ठांना घटनेचे गांभीर्य समजण्यास मदत होईल. जंगलातील गैरकृत्यांवर आळा घालून, शिकार्‍यांवर वचक निर्माण करण्यास यामुळे मदत मिळेल. वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागपूर कार्यालयातील वन कर्मचार्‍यांना आधुनिक सॉफ्टवेअर असलेला अँन्ड्रॉईड मोबाईल फोन दिला आहे. *पाच हजार वनरक्षकांना लाभपेंच व्याघ्र प्रकल्पानंतर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील वनकर्मचार्‍यांना अत्याधुनिक शस्त्रासह अँन्ड्रॉईड मोबाईल फोन मिळणार असून, यासंदर्भात विभागीय स्तरावर प्रशिक्षणही दिले जात आहे. यात बुलडाण्याच्या अंबाबारवा अभयारण्याचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा संपूर्ण राज्यभरात सुमारे ५ हजार वनरक्षकांना लाभ मिळणार आहे.