शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व प्रियकराचा खून

By admin | Updated: December 10, 2015 02:42 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला चाकूने ठार मारण्याची घटना कामोठेत घडली आहे. ध्रुवकांत ठाकूर (२८) असे आरोपीचे नाव आहे. ध्रुवकांत कामोठे पोलिसांना शरण आला आहे.

पनवेल : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला चाकूने ठार मारण्याची घटना कामोठेत घडली आहे. ध्रुवकांत ठाकूर (२८) असे आरोपीचे नाव आहे. ध्रुवकांत कामोठे पोलिसांना शरण आला आहे. ध्रुवकांत ठाकूर हा शिपिंग कंपनीमध्ये काम करीत होता. त्याची पत्नी सुष्मिता ठाकूर (२४) ही कामोठे एमजीएम येथे मेडिकलचे शिक्षण घेत होती. २०११ ला तिचा ध्रुवकांतबरोबर विवाह झाला होता, कामोठे सेक्टर १९ मधील वेदांत दृष्टी सोसायटीत ते राहत होते. दोघांमध्ये अनेक वेळा भांडण होत असल्याने वेगळे राहण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता, तसेच घटस्फोटासाठी प्रयत्नदेखील केले होते. या दोघांचे संबंध बिघडण्यात ध्रुवकांतचा मित्र अजयकुमार लालीप्रसाद जबाबदार असल्याचा राग ध्रुवकांतच्या मनात होता. बऱ्याच दिवसांपासून अजयकुमारचे सुष्मिताबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती ध्रुवकांतला मिळाली होती. अजयकुमार शिपिंग कंपनीमध्ये काम करीत होता. मंगळवारी रात्री दुबईवरून आल्यानंतर अजयकुमार थेट कामोठेमध्ये सुष्मिताला भेटण्यासाठी आला. यावेळी तिघांमध्ये चर्चा सुरू होती. अचानक या चर्चेचे रूपांतर भांडणात झाल्याने ध्रुवकांतने धारदार शस्त्राच्या सहाय्याने अजयकुमारचा खून केला. त्यानंतर पत्नीलादेखील ठार केले. बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर ध्रुवकांतने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा डाव फसला. ही सर्व घटना आरोपीने आपल्या बहिणीला फोनवर सांगितल्यावर बहिणीने कामोठे पोलिसांना माहिती दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, या संदर्भात अधिक तपास कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार हे करीत आहेत. (प्रतिनिधी)