शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरण रखडले

By admin | Updated: July 1, 2016 02:56 IST

मुंबई - पुणे महामार्गावरील खालापूर ते बोरघाट अंडा पॉइंटपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम सात वर्षांपासून रखडले आहे.

खालापूर : मुंबई - पुणे महामार्गावरील खालापूर ते बोरघाट अंडा पॉइंटपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम सात वर्षांपासून रखडले आहे. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होऊनही चौपदरीकरणाला मुहूर्त मिळत नसल्याने स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र पाटील यांच्या काळात या बारा किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली होती. रुंदीकरणात खोपोली-शिळफाटा येथील दुकाने व घरांची होणारी अडचणही भरपाई देवून दूर करण्यात आली होती. मात्र अजूनही या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू झालेले नाही. वर्षभरापूर्वी आ. सुरेश लाड यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून या मार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली. यासाठी साडेपाचशे कोटींचा निधीही मिळाला होता. त्यालाही आता दीड वर्ष झाले आहे. अरुंद मार्गामुळे मोठ्या संख्येने अपघात होत आहेत. दोन वर्षात अपघातांनी शंभरी ओलांडली असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच शिळफाटा ते बोरघाट दरम्यान दररोज वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.>अधिवेशनात प्रश्नरुंदीकरणाचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून कार्यवाही होत नसल्याने येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहोत, असे आमदार सुरेश लाड यांनी सांगितले.मार्गाची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाने आयआरबीला दिली आहे. मार्गावर टोल आकारण्यात येतो. मात्र तरीही रुंदीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.