शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘पारदर्शकवाले’ युती का करत आहेत?

By admin | Updated: January 18, 2017 06:29 IST

मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजपाच्या नेत्यांनी बाहेर काढला.

मुंबई : मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजपाच्या नेत्यांनी बाहेर काढला. शिवसेनेवर त्यांनी थेट आरोप केले. आता तेच लोक शिवसेनेसोबत युतीची बोलणी करत आहेत. भाजपाला नेमकी कसली पारदर्शकता हवी आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. परळ येथील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. परळ येथील महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे यांच्या सभेद्वारे राष्ट्रवादीने मुंबईतील प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, राष्ट्रवादी युवतीच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, तसेच सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या वेळी सुळे म्हणाल्या की, एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, यालाच ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणायचे का, सत्तेत राहून परत पारदर्शकतेचीही भाषा केली जाते. राज्यात गुन्हेगारी शून्य व्हावी, असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणतात. मात्र, दुसरीकडे भाजपामध्ये गुंडांना वाजतगाजत प्रवेश दिला जातो. हेच भाजपाचे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे का, अशा शब्दांत त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपाचा थेट आरोप शिवसेनेवर आहे, मग आता यांच्यात युती होणार असेल, तर सर्व भ्रष्ट लोक एकत्र येत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.राष्ट्रवादी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवते. मुंबईतील सध्याच्या स्थितीला सत्ताधारी जबाबदार आहेत. मुंबईचा विकास फक्त राष्ट्रवादीच करू शकते. शिवसेनेच्या ‘डिड यू नो?’ या टॅगलाइनला आमचे ‘यू शुड नो’ हे उत्तर असेल, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)>पूर्वी शिवसेना आणि मनसे व्हॅलेंटाइन डेला विरोध करायचे. आता ते सेलिब्रेट करत आहेत. आता ते मॉडर्न होत आहेत. त्यांच्या नेत्यांची मुलेच इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकत आहेत, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला.सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईतील वॉर रूममध्ये बसून प्रचारकामाचा आढावा घेतला.