शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चांगले दिवस नक्की कोणास? उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

By admin | Updated: January 5, 2015 11:11 IST

काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - शुक्रवारी रेल्वे यंत्रणा कोलमडल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन जो गोंधळ झाला त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले असा प्रश्न 'सामना'तील अग्रलेखातून विचारला आहे.
शुक्रवारी मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे दिवा-मुंब्रा स्थानकातील संतप्त प्रवासी रुळांवर उतरल्याने एकच गोंधळ माजला, जवळजवळ दंगलच सुरू झाली. अनेकांनी  तोडफोड केली, मोटरमन्सनाही मारहाणीचा फटका बसला. या सर्व प्रकाराबाबत अग्रलेखात नाराजी नोंदवण्यात आली आहे. मात्र ही हिंसक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत कोण असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे अनेकांचे रोजगार, शाळा, कॉलेज, परीक्षा बुडाल्या, यासाठी रेल्वेचे प्रशासन जबाबदार आहे. मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा तिकीट मिळेल अशी योजना रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली, पण तिकीट घेऊनही फलाटावरून गाडी सुटणार नसेल तर लोकांच्या मनातील संतापाचा स्फोट हा होणारच, अशी टीकाही करण्यात आली आहे. 
कॉंग्रेस राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस कोणाच्या वाट्यास आले हा प्रश्‍नच आहे. दुसर्‍यांचे सरकार असते तेव्हा लोकांनी कायदा हातात घ्यावा असे ज्यांना वाटत होते त्यांचे सरकार देशात व राज्यात अवतरले आहे. काँग्रेस राजवटीत उडालेला भडका हा जर लोकभावनेचा उद्रेक होता तर मग आता तोच उद्रेक कायदा सुव्यवस्थेची होळी वगैरे ठरू नये असे सांगत असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार काय करणार आहे तेवढे सांगावे, असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे.