शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण ?

By admin | Updated: December 12, 2015 02:53 IST

सौदी अरबियात भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे.

अहमद जावेद सौदीत राजदूत : पडसाळगीकर, माथूर, बोरवणकर, बर्वे, जयस्वाल या नावांची चर्चामुंबई : सौदी अरबियात भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे. ते लवकरच नवीन पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तथापि, गृह खात्यातील सूत्रांनुसार दत्ता पडसाळगीकर, सतीश माथूर आणि मीरा बोरवणकर यांच्या नावांची चर्चा आहे.तथापि, या पदासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरील व्यक्तीची वर्णी लावण्याचे ठरल्यास संजय बर्वे (अतिरिक्त पोलीस महासंचालक -लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) व सुबोध जयस्वाल (रॉ-फ्रान्समध्ये प्रतिनियुक्ती) यांना पसंती दिली जाईल. मुंबईचे पोलीस आयुक्तपदासाठी दत्ता पडसाळगीकर नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पसंती होती; परंतु त्यांनी त्या वेळीच नकार दिला होता. महासंचालक पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची परंपरा सरकारने कायम ठेवल्यास सतीश माथूर किंवा मीरा बोरवणकर यांचा पर्याय असेल. १९८१च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले माथूर हे सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे प्रमुख आहेत, तर बोरवणकर पोलीस महासंचालक (कायदा आणि तांत्रिक विभाग) आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे सरकारने ठरविल्यास सुबोध जयस्वाल आणि संजय बर्वे हे दोघे शर्यतीत असतील.