शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रिक्षा उभ्या राहणार कुठे?

By admin | Updated: July 12, 2017 03:45 IST

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे. त्यामुळे आधी आहेत तीच वाहने उभी राहण्यासाठी व्यवस्था करा, त्यानंतर नवीन रिक्षांसाठी सुसज्ज स्टॅण्ड देऊन त्या रस्त्यावर आणा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केली. ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मधील ‘नव्या साडेपाच हजार रिक्षांचा जाम’ या वृत्ताची दखल घेत चौधरी यांनी यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीतील शहरांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असताना शहरात नवीन रिक्षा आल्यास कोंडीत आणखी भर पडेल. नव्या वाहनांना शहरात प्रवेश नाही, असे शिवसेनेचे धोरण नाही. पण आहे त्या वाहनांबाबत ठोस भूमिका घ्यावी. डोंबिवलीत नेमके रिक्षा स्टॅण्ड किती, त्यांची क्षमता किती, नव्याने येणाऱ्या रिक्षा उभ्या कुठे करणार, याचा विचार संबंधित यंत्रणेने करावा. तो नागरिकांसमोर मांडावा आणि त्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मगच निर्णय घ्यावा. त्यासंदर्भात आरटीओ अधिकारी, शहर वाहतूक शाखा, सामाजिक संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांचे हित महत्त्वाचे असली तरी आगोदर शहरात वाहनांची कोंडी होत आहेत. त्यात नव्याने डोंबिवलीच्या वाट्याला दोन हजार रिक्षा येणार, त्या उभ्या कुठे राहणार, त्यांना स्टॅण्ड कुठे मिळणार, याचा विचार का केला जात नाही, असा सवाल भाजपप्रणित रिक्षा युनियनचे सचिव दत्ता माळेकर यांनी केला.>पत्र देणे हा विरोधाभास : राजेश कदम नवीन रिक्षांचे परवाने परिवहन मंत्र्यांनीच खुले केले आहेत. त्यामुळे चौधरी पत्र देऊन काय करणार? पत्र देणे हा विरोधाभास आहे. डोंबिवलीत आधीच जागा नाही. एवढ्या रिक्षा काय करायच्या आहेत. जागा दाखवा आणि परवाना द्या. इमारत बांधतांना पार्किंग द्यावे लागते तर मग नवी वाहने कुठे उभी राहणार? त्यासाठी आधी जागा दाखवा आणि मग परवाने घ्या, असे बंधन का नाही?, परिवहन मंत्र्यांनी यात लक्ष घालावे. तसेच परवाने देताना मराठी माणसांना आधी द्या, असे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केले आहे.