शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकासाठी पैसे येणार कुठून?

By admin | Updated: December 27, 2016 01:09 IST

भाजपा सरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जाते आणि आकडे फुगवून सांगत जनतेची दिशाभूल करण्यातच ते धन्यता मानतात. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना

नाशिक : भाजपा सरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जाते आणि आकडे फुगवून सांगत जनतेची दिशाभूल करण्यातच ते धन्यता मानतात. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये कोठून आणणार? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यावर सोमवारी आले. ते म्हणाले, ‘भाजपाचे सरकार काँग्रेसवाल्यांचाच कित्ता गिरवत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आखत, त्यांनी त्याचे एक उदाहरण दिले आहे.’ सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी साडेतीन हजार कोटी आणणार कोठून? जनतेपुढे फुगवलेले आकडे मांडणे, या सरकारला चांगले जमते. आकड्यांचा ‘खेळ’ करणे सोपे जरी असले, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा या सरकारची भूमिका बदललेली असते. लोकांची स्मरणशक्ती कमी आहे, असे गृहीत धरून भाजपा सरकार घोषणा करत आले आहे. मात्र, लोकांच्या सर्व घोषणा लक्षात असून, त्यापैकी किती घोषणा खऱ्या ठरल्या, त्याचे ‘गणित’ही जनतेने जुळवून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुकणे धरणातून साडेसोळा किलोमीटरची जलवाहिनी, तसेच जॅकवेलचे सुमारे १२० कोटींचे महापालिकेचे ठळक काम प्रगतिपथावर असून, लवकरच हा प्रकल्प नाशिककरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना पुढील किमान २५ वर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) महाराजांचा ‘ठेवा’ सुरक्षित ठेवामहाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांच्या शौर्याची साक्ष देणारे अनेक दुर्ग, किल्ले राज्यात उभे आहेत. मात्र, काळानुरूप त्यांची दुरवस्था झाली असून, महाराजांचा हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित करण्याऐवजी भाजपा सरकार केवळ पुतळे उभारून काय साध्य करणार आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला. भाष्य नाही : मनसेचे नाशिकला एकूण ४० नगरसेवक होते. त्यापैकी केवळ १४ नगरसेवक आता पक्षात आहेत. नगरसेवक पक्ष सोडून जात असल्याबद्दल ठाकरे यांनी कोणतेही भाष्य केले नाही.