शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकांसाठी पैसा येतो कुठून?

By admin | Updated: November 20, 2015 04:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक बांधण्यासाठी व सेवाग्राम येथील आश्रमाच्या विकासाकरिता राज्य शासनाकडे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक बांधण्यासाठी व सेवाग्राम येथील आश्रमाच्या विकासाकरिता राज्य शासनाकडे कोट्यवधी रुपये आहेत, पण राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींकरिता शासन काही लाख रुपये देऊ शकत नाही, असे परखड भाष्य करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाच्या अशा भूमिकेवर खंत व्यक्त केली. तसेच, स्मारकांसारख्या अनुत्पादक बाबींसाठी कोठून पैसा येतो, अशी मौखिक विचारणाही शासनास केली. न्यायालयाने आदेश देऊनही ४ वॉच टॉवर व इतर काही सुरक्षेसंदर्भातील बांधकामे निधीअभावी रखडल्यामुळे गडचिरोली जिल्हा कारागृह अद्याप कार्यान्वित होऊ शकलेले नाही. हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. यामुळे उद्विग्न झालेल्या न्या. भूषण गवई व न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने या प्रकरणात आदेश देताना शासनाला कडक शब्दांत फटकारले.राज्य शासनाने विविध उद्देशांकरिता कधी १०० कोटी तर, कधी १००० कोटी रुपये मंजूर केल्याचे वृत्तपत्रांमध्ये नेहमीच वाचायला मिळते. परंतु, यासोबतच राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, सामाजिक व आर्थिक विकास करणे व शांतता निर्माण करणे हेदेखील शासनाचे कर्तव्य आहे हे नव्याने सांगायला नको, असे न्यायालयाने नमूद केले. (प्रतिनिधी)नक्षली कैद्यांच्या प्रकरणावरून झापलेनागपूरसह अन्य विविध कारागृहांत बंदिस्त न्यायाधीन नक्षली कैद्यांना सुरक्षेच्या कारणावरून न्यायालयात हजर करण्यात येत नाही. याविरुद्ध मानवाधिकार संरक्षण समितीच्या सदस्य डॉ़ शोमा सेन यांनी याचिका केली आहे. या कैद्यांविरुद्ध गडचिरोली जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये खटले प्रलंबित आहेत. जिल्हा कारागृह कार्यान्वित केल्यास नक्षली कैद्यांना न्यायालयात उपस्थित करणे कठीण जाणार नाही, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.निधी मिळत नसल्यामुळे वॉच टॉवरसारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. यामुळे न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून शासनाची कानउघाडणी केली. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. कैलास नरवाडे यांनी बाजू मांडली.प्रधान सचिवांना समन्सउच्च न्यायालयाने प्रकरणातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता प्रधान सचिव (कारागृह) यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ३ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्यामुळे कारवाई का करण्यात येऊ नये यावर लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे गडचिरोली जिल्हा कारागृहातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. पूर्वी कारागृहाची इमारत निरुपयोगी व विनासुरक्षा पडलेली होती. मुदत दोन महिन्यांनी वाढवूनही काम झाले नाही. उलट सरकारने निधीची कमतरता असल्याची सबब पुढे केली.अनुत्पादक बाबींसाठी शासनाकडे भरपूर पैसा आहे; पण, मूलभूत बाबींकरिता पैसे देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. - न्यायालय