शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात पकडलेली रक्कम जाते कुठे?

By admin | Updated: October 5, 2014 00:18 IST

निवडणूक म्हटले की, मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते.

मंगेश पांडे - पिंपरी
निवडणूक म्हटले की, मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. या तपासणीत अनेकदा मोठी रोकडही आढळते. मात्र, सापडलेल्या रकमेचे काय होते, रक्कम कुठे जाते याबाबत नागरिकांनाच प्रश्न पडतो.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून पोलिसांना दिले आहेत. पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिका:यांच्या पथकाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. संशयित वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. उमेदवारांचे निवासस्थान व संपर्क कार्यालय परिसरात निवडणूक विभागाचे अधिक लक्ष आहे. या परिसरात जाणा:या-येणा:या वाहनांवर करडी नजर ठेवली जात आहे. संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.  ओळखपत्र पाहू, तुमच्या परिसरात राहणा:या प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव सांगा या प्रश्नांना वाहनचालकाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची उत्तरे देताना अडखळल्यास अधिकच सखोल चौकशी केली जात आहे. वाहन तपासणीत अनेकदा मोठी रक्कम पकडली जाते. या रकमेचा तपशील संबंधित व्यक्तीने पोलिसांना सादर करावा लागतो.  सीआरपीसी कलम 41 (ड) या अंतर्गत बेहिशेबी अथवा संशयास्पद रक्कम जप्त करण्याची तरतूद आहे. मोठी रक्कम बाळगणारा व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडे चौकशी केली जाते. दरम्यान, त्या व्यक्तीने समाधानकारक उत्तरे न दिल्यास अथवा त्याच्याकडे रकमेच्या व्यवहाराची कागदपत्रे उपलब्ध नसल्यास रक्कम जप्त केली जाते.  रकमेचा प्राप्तिकर भरलेला आहे का, याची पडताळणी केली जाते. त्यानंतर न्यायालयात कागदपत्रे सादर करून रक्कम परत मिळते. तर ती रक्कम निवडणुकीशी संबंधित असल्याची माहिती समोर आल्यास निवडणूक विभागामार्फत कारवाई केली जाते.
 
कारवाईचा देखावा
4चौकशी करण्याचा अनेकदा देखावा केला जातो. कारवाई केल्याचे कागदोपत्री दाखविण्यासाठी एखाद्या ठिकाणी नाकाबंदी करायची, पाच-दहा वाहने अडवून चौकशी करायची, असे प्रकार अनेकदा घडतात.
कारवाईची तरतूद
4निवडणूक काळात पैसे वाटप करताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीस पोलीस ताब्यात घेतात. त्याच्याकडे सखोल चौकशी केली जाते. संबंधित व्यक्ती उमेदवाराशी संबंधित आहे का, निवडणुकीशी काही संबंध आहे. त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कलम 171 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला जातो. 
 
4चिखलीतील पूर्णानगर येथे शनिवारी 22 लाखांची रोकड पकडण्यात आली. ही रक्कम बाळगणा:याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे देण्यात आली. तसेच सोमवारी रात्री उर्से टोल नाक्यावर 58 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 
4निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाहनांची तपासणी होत असल्याने रीतसर व्यवहार करणा:या व्यक्तींनाही रक्कम बाळगणो कठीण झाले आहे. पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
4निवडणूक काळात 5क् हजारांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगू नये असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिकची रक्कम जवळ असल्यास त्याचा खुलासा द्यावा.