शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

कुठे गेले अच्छे दिन ?

By admin | Updated: October 5, 2014 01:01 IST

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवास्वप्न दाखविले, परंतु अवघ्या चार महिन्यातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुठे गेले अच्छे दिन,असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज

पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल : काँग्रेसला एक हाती सत्ता द्यानागपूर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवास्वप्न दाखविले, परंतु अवघ्या चार महिन्यातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुठे गेले अच्छे दिन,असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेत्यांना केला. शनिवारी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त पारडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार गेव्ह आवारी, विलास मुत्तेमवार, बाबुराव वंजारी, तानाजी वनवे,युवक काँग्रेसचे बंटी शेळके नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. शंभर दिवसात विदेशी बँकातील काळा आणण्याची गर्जना भाजप नेत्यांनी केली होती. परंतु कुठे गेला हा पैसा. गुजरातच्या मार्गावर केंद्राची वाटचाल सुरू आहे. परंतु गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. म्हणूनच आम्ही दिलेले जाहीर चर्चेचे आवाहन स्वीकारण्याचे धाडस मोदी यांच्यात नाही. असे असले तरी मराठवाडा, विदर्भाचा विकास झाला तरच महाराष्ट्र पुढे जाईल. काँग्रेसला एक हाती सत्ता द्या, विकास काय असतो ते आम्ही दाखवू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. नागपूर मेट्रोचे कामाला आम्ही सुरुवात केली. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नरेंद्र मोदींना आणून फित कापली. प्रकल्प आम्ही उभारले फित कापण्याचे काम भाजप नेते करीत आहेत. राज्यातील पालघर येथील प्रस्तावित सागरी सुरक्षा प्रबोधनी गुजरातला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. परंतु महाराष्ट्रातील भाजप नेते गप्प होते. महाराष्ट्रात भाजपचा नेता क ोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच ते मोदींच्या सभांची वाट बघत आहेत. काँग्रेस सरकारने मेट्रोसाठी प्रयत्न केला, शेतकऱ्यासाठी १२-१३ हजार कोटींच्या योजना आणल्या. राजीव गांधी जीवनदायी योजना, मोफत औषध सुविधा, रोजगार निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन , झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र असे लोकोपयोगी उपक्र म राबवावयाचे आहेत. तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी , राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँगे्रसला एक हाती सत्ता द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले.सिंंचनावरील श्वेतपत्रिका व राज्य बँकेवर प्रशासन नेमल्याने मित्र पक्ष नाराज झाला. पारदर्शी व स्वच्छ कारभार देण्याचा प्रयत्न केला. परंतु यात आडकाठी आणण्याचे प्रयत्न झाल्याची टीका चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली.गेल्या पाच वर्षात पूर्व नागपुरातील विकास ठप्प झाला. त्यामुळे नागरिकांत निराशेचे वातावरण आहे. परंतु जनतेने सेवेची संधी दिल्यास पाच वर्षात मतदारसंघाचा कायापालट करू, अशी ग्वाही अभिजित वंजारी यांनी दिली.सभेला मोठी गर्दी होती.(प्रतिनिधी)दूध का दूध, पानी का पानीभाजपने २५ वर्षापूर्वीची युती तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही १५ वर्षापूर्वीची आघाडी तोडली. कुणालाही बहुमत मिळाले नाही तर निवडणुकीनंतर घोडेबाजार होईल. १९९५ सालात राज्यातील जनतेने युतीचा खंडणी वसुलीचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे आव्हान चव्हाण यांनी विरोधकांना दिले.