शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला आलेले पाणी जाते कुठे ?

By admin | Updated: May 7, 2016 02:20 IST

लातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

- अतुल कुलकर्णी,  मुंबईलातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही नागरिकांनी थेट मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. लातूर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हे पाणी जनतेला मिळत नसल्याचा प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात पहिल्यांदा एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा केला गेला. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यासाठी विशेष निधी मंजूर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक वर्षे बंद पडलेले जलशुध्दीकरण केंद्र अवघ्या १५ दिवसांत सुरू केले. एवढे करूनही केवळ वाटपातील गोंधळामुळे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर गृह विभागाने पाणी वाटपाबाबतचा अहवाल मागवला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी लातूर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे काही नगरसेवकांची लॉबी यात कार्यरत झाली असून, ज्यांनी मते दिली त्यांनाच पाणी द्या, असे राजकारण सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याबाबतही तक्रारी आहेत. रेल्वेने आलेले पाणी विहिरीत सोडल्यानंतर रात्री ते टँकर लॉबीला विकले जात असल्याचे निदर्शनास आले. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांची तातडीने बदली करण्याच्या सूचना दिल्या असून, येत्या आठवड्यात पालिकेला नवीन आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. शिवाय जे नगरसेवक दुष्काळात देखील पाण्यावरून राजकारण करीत असतील तर त्यांची कृत्ये उघडकीस आणून त्यांना जनतेसमोर उघडे पाडा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.खासगी टँकर पाणी पळवून करतात विक्री ?रेल्वेने रोज २५ लाख लीटर्स आणि माकणी धरणातून २५ लाख लीटर्स असे ५० लाख लीटर्स पाणी लातूरला मिळते. १०५ टँकर्सद्वारे ते नागरिकांना पुरविण्यात येते. मात्र खासगी टँकर्सद्वारे हे पाणी पळविले जात असून, त्याची विक्री होत असल्याचे समजते.