शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ कधी होणार ?

By admin | Updated: November 28, 2014 01:05 IST

देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूरचा क्रमांक दुसरा लागतो. स्वरयंत्र आणि तोंडाच्या कॅन्सरमध्ये देशात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच उपराजधानीत दरवर्षी सुमारे सहा हजारांवर नव्या कॅन्सरग्रस्तांची

मेडिकलला आजही प्रतीक्षा : राज्यासह केंद्राला पाठविले पाचवेळा प्रस्ताव सुमेध वाघमारे - नागपूरदेशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूरचा क्रमांक दुसरा लागतो. स्वरयंत्र आणि तोंडाच्या कॅन्सरमध्ये देशात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच उपराजधानीत दरवर्षी सुमारे सहा हजारांवर नव्या कॅन्सरग्रस्तांची नोंद होते. मात्र मुंबई,औरंगाबाद व पुणे शहराच्या तुलनेत नागपुरातील यंत्रसामग्री, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची उपलब्धा तोकडी आहे. येथील मेडिकलच्या कर्करोग विभागाचा भार आजही कालबाह्य कोबाल्ट युनिटवरच आहे. याला घेऊन स्वत: कॅन्सर रुग्णांनी आंदोलन केले. मेडिकलच्या कर्करोग विभागानेही तब्बल पाचवेळा स्वतंत्र कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव राज्यासह केंद्राला पाठविला, परंतु दरवेळी तोंडाला पाने पुसण्यात आली. शासनाच्या उदासीनवृत्तीमुळे कॅन्सर रुग्ण अडचणीत सापडला आहे.उपराजधानीत मेडिकलमध्येच नाही तर खासगी इस्पितळांमध्येही कॅन्सर रु ग्णांची संख्या वाढत आहे. यातील साधारण ६० टक्के रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु येथील कर्करोग विभाग मरणासन्न अवस्थेत आहे. २००६ मध्ये लावलेले कोबाल्ट युनिट कालबाह्य झाले आहे. असे असतानाही या यंत्रावर दोन हजार रुग्णांचा उपचार केला जात आहे. जुने तंत्रज्ञान आणि दोनच तंत्रज्ञ असल्याने फक्त ७० ते ८० रुग्णांनाच रोज रेडिओथेरपी देणे शक्य होत आहे. यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी लांबली आहे. नव्या रुग्णाला महिनाभरानंतरची तारीख दिली जात आहे. यालाच घेऊन त्रस्त कॅन्सर रुग्णांनी २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन केले.