शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या चारही नद्यांजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कधी ?

By admin | Updated: February 14, 2017 04:11 IST

शहरातील चार मोठ्या नद्यांजवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्र केव्हा उभारणार? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने यासंदर्भातील

मुंबई : शहरातील चार मोठ्या नद्यांजवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्र केव्हा उभारणार? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने यासंदर्भातील तपशिलवार माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले.पावसाळ्यात नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.२००५ सारखा महाप्रलय टाळण्यासाठी आणखी एका डॉप्लरची आवश्यक असल्याने हवामान खात्याला ते बसवण्याचा आदेश द्यावा, अशी मागनी याचिकाकर्ते व व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी खंडपीठाकडे केली आहे.२००५ च्या महाप्रलयासारखा प्रसंग पुन्हा उद्धवू नये, यासाठी सरकारने तोडगा काढण्याकरिता चितळे समितीची नियुक्ती केली. मात्र या समितीने केलेल्या शिफारशींची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील सी.के. नायडू यांनी खंडपीठाला दिली.चितळे समितीने त्यांच्या अहवालात मुंबईच्या चारही मोठ्या नदयांच्या जवळपास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची शिफारस केली होती. मात्र या शिफारशीची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले. ‘२०१३ पासून अद्याप महापालिकेने समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी केली नाही, असे रेकॉर्डवरून दिसते. या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही (महापालिका) मेहनत घेतली पाहिजे. यंदाच्या पावसाळयापूर्वीच हे पूर्ण करणे अपेक्षित आहे,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)