शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

.जेव्हा एक कप चहासाठी रेल्वे अधिकार्‍यांनी मोजले १0 रुपये

By admin | Updated: July 15, 2014 00:55 IST

रेल्वे स्थानकावर मनमानी कारभार : स्टॉल केले सील

अकोला : रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांंची विक्री करणारे काही व्यावसायिकांचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा प्रत्यक्ष अनुभव दस्तुरखुद्द भुसावळ रेल्वे मंडळाचे सहाय्यक प्रबंधकांनी शनिवारी घेतला. त्यांना चहाच्या ५ रुपयाच्या एका कपासाठी चक्क १0 रुपये मोजावे लागले. एवढेच नव्हे तर कपातील चहाचे प्रमाणदेखील कमी असल्याचे त्यांना आढळून आले. घडल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंडळ अधिकार्‍यांनी ५ रुपयाचा चहाचा कप १0 रुपयाला विकणार्‍या फलाट क्रमांक दोनवरील सूर्या फूड अँग्रो लिमिटेड हे स्टॉल सील केले. अकोला रेल्वे स्थानकावर असलेल्या काही खाद्यपदार्थांंंच्या दुकानांवर मूळ किमतीपेक्षा जादा किमतीने खाद्यपदार्थांंंची विक्री होत असल्याच्या तक्रारी भुसावळ रेल्वे मंडळ प्रबंधकांकडे प्राप्त झाल्या होत्या. पदार्थांंंचा दर्जा आणि त्यांचे प्रमाण देखील कमी असल्याचा त्या तक्रारींमध्ये उल्लेख असल्याने संधीच्या शोधात असलेल्या सहाय्यक प्रबंधकांनी रेल्वे स्थानकाच्या तपासणीदरम्यान सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री ८.१५ ला अकोला रेल्वेस्थानकाच्या अप लाईनवर शंटिग करणार्‍या इंजीनची चाके रेल्वे रूळाखाली उतरली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक प्रबंधक प्रदीप बारापात्र आपल्या चमूला सोबत घेऊन विशेष गाडीने अकोल्यात दाखल झाले होते. इंजीन रुळावर आणण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पहाटे २.३0 च्या सुमारास भुसावळकडे परतण्यापूर्वी त्यांनी फलाट क्रमांक २ आणि ३ ची पाहणी केली. दरम्यान, अजय ठाकूर यांच्या सूर्या फूड अँग्रो लिमिटेड या स्टॉलवर ते पोहोचले. या ठिकाणी त्यांनी चहा व त्याची किमत विचारली. स्टॉलवर हजर असलेल्या कर्मचार्‍याने एका कपमध्ये अध्र्यापेक्षाही कमी चहा भरून त्यांच्याकडे १0 रुपयांची मागणी केली. अधिकार्‍यांची ओळख नसलेल्या त्या कर्मचार्‍याने चहाच्या दर्जाबाबत अधिकार्‍यांनी विचारणा केली असता भडकून त्याची कॉलर ओढेपर्यंंंत मजल मारली. मात्र, चहा मागणार्‍या व्यक्तीची खरी ओळख समजताच त्याने अधिकार्‍यांच्या पायाशी लोळण घेतले.शनिवारी सकाळी भुसावळ रेल्वे मंडळ प्रबंधकांच्या चमूने परत अकोला गाठले. स्थानिक अधिकर्‍यांना सोबत घेऊन त्यांनी अजय ठाकूर यांचे स्टॉल १५ दिवसांसाठी सील केले. मंडळ अधिकार्‍यांच्या या कारवाईमुळे रेल्वे स्थानकावर मनमानी कारभार करणार्‍यांमध्ये खळबळीचे वातावरण आहे.