मुंबई- लोकमत विधिमंडळ पुरस्कारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, मला २००३-०४ साली उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अधिवेशन काळातच तो देण्यात आला. सभागृहात तेव्हाही विदर्भाच्या प्रश्नावरुन गोंधळ सुरु होता. अनावधानाने भाषणाच्या ओघात मी ‘असाच अन्याय करत राहाल तर महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’, असे बोलून गेलो. त्यावरून बराच गोंधळ झाला. माझ्या माफीनाम्यासाठी काही सदस्य अडून बसले. मी नकार दिला. पण आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला समजावून सांगत माफी मागून मोकळे होण्याचा सल्ला दिला. त्यावरून मी दिलगिरी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशीचे वर्तमानपत्र उघडून बघतो तर काय, माझ्या पुस्काराची बातमीच नाही! त्याऐवजी माझ्या वक्तव्याचीच बातमी झाली. तेव्हा कुठे माला न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली! मुख्यमंत्र्यांच्या या किश्श्याने सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
तेव्हा न्यूज व्हॅल्यू कळली!
By admin | Updated: August 5, 2016 05:12 IST