शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

जेव्हा कुंचला कुलदीपला शरण जाता

By admin | Updated: November 24, 2014 23:06 IST

घरातून वारसा : २८0 तासांत साकारले राज्याभिषेकाचे चित्रे

इस्लामपूर : शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत. कलेच्या प्रांतातील पदवी, औपचारिक शिक्षण नाही. घरातील चित्रकलेचा वारसा मिळाला, हीच त्याची शिदोरी. वाळव्याचा कुलदीप पोतदार हे सहजपणे सांगतो आणि निमंत्रितांना आपल्या अभिजात कलेची अदाकारी दाखवतो, तेव्हा त्याची चित्रे पाहताना कुंचलाच जणू कुलदीपला शरण गेल्याची भावना नकळत मनात उमटते.साधारणपणे १९८८ च्या सुमारास कुलदीपने आपल्या हाती कुंचला धरला आणि तो बघता-बघता वाळव्यापासून दिल्लीपर्यंत पोहोचला. कुंचला हेच त्याचे भावविश्व आणि जीवन बनून गेले आहे. माझे चित्र पाहणाऱ्या व्यक्तीला समाधान मिळणार, हा कुलदीपचा ठाम विश्वास. हाती कुंचला आला नाही, असा दिवस गेला, तर मन सैरभर होते, असे सांगणारा हा चित्रकार तेवढ्याच ताकदीचा छायाचित्रकारही आहे.कुलदीपच्या कुंचल्यातून २८ दिवस व २८0 तासांच्या परिश्रमातून साकारलेली शिवराज्याभिषेकाची प्रतिमा डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली आहे. राज्याभिषेकाच्या मूळ चित्रापेक्षा आकर्षक प्रतिमा बनवताना त्यातील मूळ संकल्पना आणि तत्त्वांना धक्का बसणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेत कुलदीपने आपला रंगांचा आविष्कार दाखवला आहे. इंग्लंडमध्ये निर्मिती झालेले विन्सल न्यूट्रॉनचे रंग वापरुन कॅनव्हासवर शिवराज्याभिषेक सोहळा जिवंत करण्याची ताकद कुलदीपच्या कुंचल्यात आहे.प्रतिमेत कुठेही दिवा नाही. मात्र सगळा शामीयाना विविध रंगांच्या दीपोत्सवाने उजळून टाकण्याची कुलदीपची किमया थक्क करुन सोडणारी आहे. प्रतिमेतील मोठ्या ११0 व्यक्तिरेखा, त्यांचे पेहराव, महिलांचा साजशृंगार, ब्रिटिश अधिकाऱ्याचा कुर्निसात आणि ताटावर हिरवीगार मखमल टाकून आलेला नजराणा, शिंग, तुतारी वाजवणारे मावळे... असे किती तरी बारकावे टिपण्याची कुलदीपची प्रगल्भता, त्याची कलेशी असणारी घट्ट नाळ दाखविणारी आहे.कुलदीपच्या डोक्यात एखाद्या चित्राची कृती संचारली की, कॅनव्हासवर त्याची निर्मिती सुरु होते. या कृती आणि निर्मितीमधून जी चित्राची संस्कृती जन्माला येते, ती अवीट, अविस्मरणीय आनंदाचा ठेवा घेऊनच. (वार्ताहर)वाळवा येथील कुलदीप पोतदार याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची कलाकृती.