शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांमध्ये घुमणार आवाज कुणाचा?

By admin | Updated: November 24, 2014 22:59 IST

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून स्टुडंट कौन्सिल आणि जनरल सेक्रेटरी निवडण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच विद्यापीठांना दिले आहेत.

मुंबई : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून स्टुडंट कौन्सिल आणि जनरल सेक्रेटरी निवडण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच विद्यापीठांना दिले आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विद्याथ्र्याना महाविद्यालयीन जीवनापासून लोकशाही प्रक्रियेचा भाग असलेल्या निवडणुका परिचित व्हाव्यात आणि यामधून देशाला उत्तम नेतृत्व प्राप्त व्हावे, हा या निवडणुकांमागील हेतू होता. परंतु 1992 मध्ये मुंबईतील मिठीबाई  महाविद्यालयात एका विद्याथ्र्याची निवडणुकीदरम्यान हत्या झाल्याने महाविद्यालयातील निवडणुकीवर बंदी आणण्यात आली.
 
महाविद्यालयांतील निवडणुकीने देशाला आणि महाराष्ट्राला अनेक मोठे नेते मिळवून दिले आहेत. या नेत्यांनी आपल्या कारर्किदीत अपेक्षित असे कार्यही करूनही दाखविले आहे. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढल्याने निवडणुकीदरम्यान मारामा:या, खून होऊ लागल्याने या निवडणुकांना चाप लावला गेला. या निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी गेली काही वर्षे सर्वच राजकीय पक्ष मागणी करीत होते.
महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्यासाठी शासनाला महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करावा लागणार आहे. याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभाग घेणार असून, ही दुरुस्ती झाल्यानंतर महाविद्यालयांतील निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. यूजीसीने महाविद्यालयांत निवडणुका घेण्याबाबत विद्यापीठांना परिपत्रक पाठवले असले, तरी या वर्षी काही या निवडणुका होणार नाहीत.
महाविद्यालयांत होणा:या निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, अशी सर्वच विद्यार्थी संघटनांची अपेक्षा आहे. परंतु निवडणुकीबाबत कितीही बंधने घातली तरी महाविद्यालयांत राजकीय पक्षांचा आवाज घुमणार, हे मात्र निश्चित.
 
विद्याथ्र्यामुळे जीएस निवडला जाईल
कॉलेजेसमध्ये निवडणुका झाल्याच पाहिजेत. सध्या शिक्षकांच्या संपर्कात असलेल्यांनाच संधी मिळते. मात्र ज्यांच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता असते, त्यांच्यावर यामुळे अन्याय होतो. निवडणुकीमुळे विद्यार्थी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून देतील. कोणाला किती पाठिंबा आहे हे कळेल. शिवाय निवडून येणारा जीएस विद्याथ्र्याचे प्रश्न सोडवेल; कारण तो विद्याथ्र्याच्या पाठिंब्याने निवडून आलेला असणार. राजकीय पक्षांना टाळावे.
- अश्विनी घोंगे, श्री भाऊसाहेब वर्तक कॉलेज, बोरीवली
 
निवडणुकीला आचारसंहिता असावी
महाविद्यालयीन निवडणुकांनी देशाला आणि महाराष्ट्राला अनेक दिग्गज नेते दिले आहेत. निवडणुका बंद झाल्याने देशाला तरुण नेतृत्व मिळेनासे झाले आहे. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, याकरिता येथेही निवडणूक आचारसंहिता लागू करावी. निवडणुकीला शिस्त असल्यास भावी पिढी घडविण्यासाठी या निवडणुकीचा मोठा हातभार लागेल.
- महादेव जगताप,
युवा सेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य  आणि व्यवस्थापन परिषद सदस्य 
 
राजकीय पक्षांच्या संघटनांना बंदी असावी
महाविद्यालयांमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार आंदोलन केले आहे. लिंगडोह समितीने केलेल्या शिफारशीनुसार महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्या पाहिजेत. राजकारणात घराणोशाही निर्माण झाली असून, विद्यार्थी चळवळ पूर्णपणो नामशेष झाली आहे. ही चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये निवडणुका आवश्यक आहेत. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचा सहभाग नसावा, अशी आमची मागणी आहे.
-यदूनाथ देशपांडे, अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश सह संघटनमंत्री
 
नवीन नेतृत्व मिळेल
महाविद्यालयात निवडणुका सुरू झाल्यास याचे स्वागतच आहे.  या निवडणुका बंद झाल्याने लीडरशिप बंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुका सुरू झाल्यास देशाला नवीन नेतृत्व मिळेल.
-संतोष गांगुर्डे, मनविसे मुंबई विद्यापीठ सरचिटणीस
 
निवडणूक विद्याथ्र्यामध्येच व्हावी
कॉलेजमध्ये निवडून येणारा जीएस हा डेअरिंगबाज असावा. असा जीएस मिळवण्यासाठी निवडणूक व्हायलाच पाहिजेत़ मात्र त्याचवेळी या निवडणुका होताना कॉलेज, युनिव्हर्सिटीचे पूर्णपणो कंट्रोल असणो आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको. विद्याथ्र्यासाठी असलेली निवडणूक विद्याथ्र्यामध्येच व्हावी.
- रवि जैसवाल, चेतना कॉलेज, वांद्ऱे
 
राजकीय पक्ष नकोत
शिक्षकांच्या नजरेत असणारा विद्यार्थी हा जीएस बनतो ही गेल्याकाही वर्षात जीएस ठरण्याची प्रक्रिया बनलेली आहे. पुन्हा एकदा निवडणुका होणार असतील तर ते स्तुत्य आहे. त्याचबरोबर जो विद्यार्थी निवडणुकीला उभा राहील त्याची शिक्षकांमध्ये ओळख असणोही गरजेचे आहे, नाहीतर त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे या निवडणुकीचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही फायदे आहेत. राजकीय पक्ष आल्यावर नेहमीच विद्याथ्र्यावर दबाव येतो. त्यामुळे निवडणुका व्हाव्यात, मात्र राजकीय पक्ष नको.
- प्रीती गुप्ता, डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले
 
निवडणूक कॉलेज कॅम्पसमध्ये व्हावी
जीएस निवडणूक व्हावी. निवडणूक येणारा जीएस हा सर्वाचा असेल. तो सर्वासाठी काम करणारा असेल. मुळात ज्युनिअर्स व नवीन विद्याथ्र्याना त्याची अधिक मदत होऊ शकते. त्याचवेळी राजकीय पक्षांचा हस्तक्षेप पूर्णपणो टाळावा. यासाठी संबंधित कॉलेज व विद्यापीठाने योग्य निर्णय घ्यावा. कॉलेज कॅम्पसमध्येच निवडणुका झाल्यास त्याचा सकारात्मक निकाल पाहायला मिळेल़
- आकाश नागरे , विवेक कॉलेज, गोरेगाव