शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

अशा 'सुसंस्कृत' नेत्याविषयी मुख्यमंत्र्यांनी काय ते ठरवावे- शरद पवार

By admin | Updated: October 13, 2016 08:17 IST

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणे असंस्कृतपणाची आणि बेजबाबदारपणाची होती.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणे असंस्कृतपणाची आणि बेजबाबदारपणाची होती. त्या गडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय वर्तमान राज्यकर्त्यांचा होता. आणि त्याच्याशी बारामतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुरान्वयानेही संबंध नाही. परंतु भाषणे करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली नाही. त्यामुळे अशा 'सुसंस्कृत' नेत्याविषयी काय भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पवार म्हणतात, अशा असंस्कृतपणाच्या पातळीवर आपल्याला उतरता येणार नसल्याने संयम व सहनशीलता बाळगून शांतता राखावी. भगवानगडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय सर्वस्वी राज्यकर्त्यांचा होता. भाषणे करणारी मंडळी मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळे ही सर्व त्यांची अंतर्गत बाब आहे. असे असतानाही एखाद्या मंत्र्याने एखाद्या भागाचे वाटोळे करीन असे म्हणणे बेजबाबदारपणाचेच नव्हे तर मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग करणारे आहे. कारण या शपथेत मंत्री म्हणून आपण द्वेष, क्रोध या भावना न बाळगता मंत्रिपदाचे काम करेन असा उल्लेख केलेला असतो.

हा प्रकार भगवान गडाचे महंत आणि ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आहे. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे शक्य आहे. आम्ही सत्तेत नसताना देखील गलिच्छ भाषेचा उपयोग केला जात आहे. फडणवीस सरकार या प्रकाराची आणि त्यांच्या सरकारमधील 'सुसंस्कृत' मंत्र्यांची दखल कशी घेणार याकडे आमचे लक्ष लागून राहिले आहे असेही पवार म्हणाले.