शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

हे चाललेय तरी काय?

By admin | Updated: July 8, 2014 01:28 IST

शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप महाविद्यालयाच्या इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केल्याने खळबळ उडाली आहे.

प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तननागपूर : शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप महाविद्यालयाच्या इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीकडे सुपूर्द केले आहे. चौकशी सुरू असल्याने सध्याच काही बोलण्यास नकार दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दंत महाविद्यालयात सहा महिन्यांपूर्वी कंत्राट पद्धतीवर एक लेक्चरर रुजू झाले, मागील काही महिन्यांपासून इंटर्न्सच्या विद्यार्थिंनीना ‘एसएमएस’ पाठविणे, फेसबुकवर पाठविलेल्या फोटोला ‘लाईक’ करण्याचा आग्रह धरणे, विद्यार्थिनींना पार्टी मागणे किंवा पार्टी देतो म्हणून त्यांना बोलविणे, विद्यार्थिनींना विभागात बोलवून आपल्यासमोर उभे करणे, वाईट नजरेने पाहणे, विशिष्ट मुलींनाच विविध कॅम्पमध्ये पाठविणे, नाही गेल्यास त्यांना झापणे, परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देणे आदी तक्रारी विद्यार्थिंनींनी आठवड्यापूर्वी डॉ. हजारे यांच्याकडे मांडल्या. त्यांनी लागलीच महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करून चार सदस्यीय चमूंची चौकशी समिती स्थापन केली. यात दंत महाविद्यालयाच्या एक वरिष्ठ महिला डॉक्टर व दोन सदस्या बाहेरच्या आहेत. प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने फसविले नागपूर : खोटे नाव आणि पत्ता तसेच स्वत:बद्दल अतिरंजित माहिती देऊन एका तरुणाने एका प्राध्यापक तरुणीशी सलगी वाढवली. तिच्या कुटुंबीयांनाही त्याने विश्वासात घेतले. कुटुंबीयांकडून होकार मिळाल्यामुळे तरुणीसोबत सैरसपाटा करण्याचा बेत आखला आणि रस्त्यातच त्याने तिच्याशी लगट केली. त्याचे कलुषित मनसुबे लक्षात आल्यामुळे तरुणीने कुटुंबीयांकडे आणि नंतर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या बनवाबनवीची चक्रावून टाकणारी माहिती उघड झाली. एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट शोभावी असे हे प्रकरण गिट्टीखदान ठाण्यात तक्रारीच्या रूपाने आले आहे. आशिष अशोकराव गायधने (वय २३) हा सक्करदऱ्यातील सोमवारी क्वॉर्टर्समध्ये राहतो. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. महिनाभरापूर्वी तो एका वधू-वर परिचय मेळाव्यात गेला. तेथे त्याने अनेक अविवाहित तरुणींची माहिती काढली.सारीच बनवाबनवी प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांनी निखिल देवतळेचा भाऊ, वडील यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. प्रत्येक वेळी एकच जण बोलत असल्याचे लक्षात आल्याने त्यांचा संशय वाढला. नंतर त्यांनी आरोपीचा पत्ता तपासला. त्यातही समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे प्रीतीने आपल्या कुटुंबीयांसोबत गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत प्रीतीला लग्नाची मागणी घालणारा निखिल देवतळे नसून आशिष गायधने असल्याचे उघड झाले. प्रीतीच्या कुटुंबीयांसोबत निखिल किंवा त्याचे नातेवाईक बोलत नव्हते, तो कोणत्याच जॉबवर नाही अन् घरचाही साधारण असून, अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला विनयभंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली.