विक्रमगड : तालुक्यातील मोह. खु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका रात्रीत विहिरीच्या आकाराचा खड्डा पडला असून अचानक निर्माण झालेला हा खड्डा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. भुगर्भात झालेली हालचाल अगर पावसाचे दिवस असल्याने हा खड्डा पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत शहानिशा करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. मोह. खु. येथील तुळशीराम पांडुरंग कोती यांच्या शेतातून रविवारी रात्री अचानक आवाज आला. सकाळी शेतात गेल्यावर विहिरीच्या आकाराचा खड्डा आणि त्यात पाण्याचा साठा आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि हा खड्डा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. (वार्ताहर)
शेतात पडला विहिरीच्या आकाराचा खड्डा
By admin | Updated: June 24, 2015 02:03 IST