शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे कल्याण

By admin | Updated: November 7, 2015 04:07 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले शिवसेना आणि भाजपा आता एकत्र आले असून, शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.

अखेर जमले : महापौरपद अडीच वर्षांसाठी वाटून घेणार !मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले शिवसेना आणि भाजपा आता एकत्र आले असून, शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात जात असताना मित्रपक्षाला दुखावण्याची जोखीम भाजपा घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीतील प्रचाराची कटुता विसरून शिवसेनेला सोबत घेण्याचे भाजपामध्ये ठरले. कल्याणमध्ये शिवसेनेला बाजूला सारून सत्तेचे गणित मांडले तर राज्याचा कारभार करताना शिवसेनेकडून असहकार्य आणि विरोधाची भूमिका घेतली जाईल व त्यातून कटुता वाढेल. त्यापेक्षा युती करून वाद मिटविण्याचा विचार भाजपाने केला, असे म्हटले जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली. त्याआधी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. युतीसाठी सर्वांनीच अनुकूलता दर्शविली. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची भूमिका युतीचीशिवसेनेला विचारात न घेता मनसे, अपक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादीत फोडाफोडी करून सत्ता मिळवावी, असा आग्रह भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांचा होता. मात्र प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र महापौरपद आधी भाजपालाच हवे, याबाबत मुख्यमंत्री आणि दानवे आग्रही आहेत.