शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतही होणार विमानाप्रमाणेच प्रवाशांचे स्वागत

By admin | Updated: October 3, 2016 05:42 IST

राजधानी एक्स्प्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे... तुमचा प्रवास सुखाचा होवो...’ अशा प्रकारचे स्वागत लवकरच पश्चिम रेल्वेवरील राजधानी व दुरान्तो ट्रेनमध्ये होईल.

मुंबई : ‘नमस्कार राजधानी एक्स्प्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे... तुमचा प्रवास सुखाचा होवो...’ अशा प्रकारचे स्वागत लवकरच पश्चिम रेल्वेवरील राजधानी व दुरान्तो ट्रेनमध्ये होईल. विमानात होणाऱ्या स्वागताप्रमाणेच एक्स्प्रेस ट्रेनमध्येही अशा प्रकारची सुविधा पश्चिम रेल्वे व आयआरसीटीसीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीतजास्त प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी प्रवाशांना उत्तम व चांगल्या सुविधा कशा पुरवल्या जातील, याकडे रेल्वेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी पहिला व वेगळा प्रयोग राजधानी व दुरान्तोसारख्या ट्रेनमध्ये केला जाणार आहे. राजधानी व दुरोन्तोच्या एसी प्रथम तसेच द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी दिली. (प्रतिनिधी)>असे करणार आकृष्टविमानातील सेवेप्रमाणेच या दोन ट्रेनमध्ये सुविधा दिली जाईल. ट्रेनमधील प्रथम श्रेणीतील प्रवाशांच्या स्वागतासाठी गाडीचे अधीक्षक, सेवा कर्मचारी आणि द्वितीय श्रेणीतील प्रवाशांच्या स्वागतासाठी सेवा कर्मचारी व तिकीट निरीक्षक असतील. प्रवास सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे आधी प्रवाशांना ते स्वत:ची ओळख करून देतील आणि पाण्याची बाटली तसेच तोंड पुसण्यासाठी टॉवेल देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच प्रवाशांना खाद्यपदार्थांची सूची देण्यात येईल. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी एक खास उद्घोषणा तयार करण्यात येत असल्याचे परिहार म्हणाले.