शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांसाठी ८९ शाळांमध्ये ‘वेलकम’

By admin | Updated: July 6, 2016 01:17 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश; राज्यातील ८९ शाळांची निवड.

आशीष गावंडे/अकोलाआदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने राज्यातील ८९ शाळांची निवड केली आहे. ह्यएसटीह्ण(अनुसूचित जमाती) प्रवर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये यंदाच्या शालेय सत्रापासून प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे.अतिदुर्गम भागात राहणार्‍या आदिवासींना शिक्षण,आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आजही कायम आहे. यावर उपाय म्हणून आदिवासी आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. बहुतांश आश्रमशाळा मराठी माध्यमाच्या आहेत. तर बोटावर मोजता येणार्‍या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम लागू आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण लक्षात घेता त्यांना इंग्रजी माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने राज्यभरातील ८९ इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांची निवड केली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ह्यएसटीह्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर खलबते झाल्यानंतर शासनाचे निकष पूर्ण करणार्‍या ८९ शाळांमध्ये चालू शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये प्रवेश देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.संस्थांसोबत करारनामाइंग्रजी माध्यमाच्या शाळा, संस्थेसोबत आदिवासी विकास विभागाने करारनामा केला आहे. त्यामध्ये मुलांचे शिक्षण,आरोग्य, सुरक्षा, निवास, आहार व अन्य सुविधा आदी उपलब्ध करून देणे संस्थेला भाग राहील. प्रकल्प अधिकार्‍यांनी करारनामा केल्यानंतर वेळोवेळी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.शाळांना दिले जाईल शुल्कनामांकित इंग्रजी शाळेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या बदल्यात वर्गवारीनुसार ५0 टक्के शुल्क शासनाकडून अदा केले जाणार आहे. उर्वरित ५0 टक्के शुल्क शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या सत्रात परीक्षेपूर्वी दिले जाईल.