शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचे सावट!

By admin | Updated: October 5, 2014 01:03 IST

सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत

कोळसा-गॅसचा तुटवडा : उत्पादन घटले नागपूर : सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार, महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पामधून किमान ५,५०० मेगावॅट विजेचे उत्पादन अपेक्षित असताना, तेथून केवळ चार ते साडेचार हजार मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. महानिर्मितीला वीजनिर्मितीसाठी रोज किमान ३२ रेक्स कोळशाची गरज असते. मात्र सध्या या कंपनीला केवळ १५ ते १६ रेक्स कोळसा मिळत आहे. त्याचा परिणाम वीज उत्पादनावर होऊन ते घटले आहे. खापरखेडा, चंद्रपूर, पारस व भुसावळ येथील प्रकल्पात फारच कमी कोळसा शिल्लक राहिला आहे. सोबतच इंडिया बुल्सकडूनही कोळशाअभावी २७० मेगावॅट वीज कमी मिळत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. याशिवाय गॅस पुरवठ्यासंबंधी विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात रत्नागिरी येथील १९५० मेगावॅटचा गॅस प्रकल्प बंद पडला आहे. तसेच उरण गॅस केंद्रातील १५० मेगावॅट वीजनिर्मिती कमी झाली आहे. खाजगी प्रकल्पापैकी अदानी प्रकल्पातून सुमारे अडीच हजार मेगावॅट वीज अपेक्षित असताना, ती गत काही दिवसांपासून केवळ १५०० ते १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. दुसरीकडे गत १५ दिवसांत विजेच्या मागणीत एक ते दीड हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. १५ दिवसांपूर्वी राज्यात सुमारे १४ हजार ५०० ते १५ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी होती. परंतु ती आता १६ हजार ५०० ते १६ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वाढली आहे. महावितरण ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजकडून रोज सुमारे १००० ते १४०० मेगावॅट वीज खरेदी करीत आहे. याशिवाय निविदा प्रक्रियेतून ३०० मेगावॅट विजेची व्यवस्था केली जात आहे. (प्रतिनिधी)