शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

उसवल्या संसाराचा विणला धागा...

By admin | Updated: June 12, 2016 03:55 IST

ऐन तारुण्यात कोणाच्या नशिबी वैधव्य, कोणाचा काडीमोड झाल्याने माहेरी होणारी हेटाळणी, दुष्काळामुळे पतीने आत्महत्या केल्यानंतर वाट्याला आलेले एकटेपणाचे जगणे...! नियतीचे भोग सहन करत जीवन

- प्रताप नलावडे, बीड

ऐन तारुण्यात कोणाच्या नशिबी वैधव्य, कोणाचा काडीमोड झाल्याने माहेरी होणारी हेटाळणी, दुष्काळामुळे पतीने आत्महत्या केल्यानंतर वाट्याला आलेले एकटेपणाचे जगणे...! नियतीचे भोग सहन करत जीवन कंठणाऱ्या अशा कित्येकींचे फाटके संसार सावरले साध्या शिलाई यंत्रांनी! ‘नाम’ व सिद्धिविनायक संस्थेच्या मदतीने पिंपळनेर (ता. बीड) येथे वंचित महिला आता स्वत:च्या पायावर उभ्या राहात आहेत.दुष्काळी स्थितीत आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, परित्यक्त्या व गोरगरीब महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेने पिंपळनेर येथे प्रशिक्षण केंद्र उघडले. महिलांच्या दृष्टीने सहज, सोपे असलेले विणकाम, शिलाईकाम, मेहंदी आदी प्रशिक्षण देण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवप्रसाद चरखा व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला. संस्थेने दहा शिलाई यंत्रे विकत घेतली. पाच प्रशिक्षित महिला नेमण्यात आल्या असून, त्यातून महिलांना शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी पिंपळनेर परिसरातील ३० गावांचा सर्व्हे करण्यात आला. यातून गरजू महिलांची निवड करण्यात आली.अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेकडे विधवा, परित्यक्त्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी शिलाई यंत्रे उपलब्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला. ‘नाम’ने ‘सिद्धिविनायक’ संस्थेचे कामकाज पाहून प्रस्ताव मान्य केला. फेबु्रवारीमध्ये ‘नाम’ने ११५ शिलाई यंत्रे पाठवून दिली. २० महिलांची एक बॅच अशा पद्धतीने दोन बॅचला एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात आले. प्र्रशिक्षणासोबतच शिलाई यंत्रही मिळाल्याने वंचित महिलांच्या उसवलेल्या संसाराचा धागा विणलाय.कामाची उपलब्धता अन् योग्य मोबदला- या महिलांना शाळांच्या गणवेशाची कामे संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहेत. काही संस्थांनी आॅर्डर दिल्या असून, आणखी काही संस्थांशी पत्रव्यवहार सुरू आहे. या महिलांना घरच्या घरी शिवणकामे मिळवून देतानाच, योग्य तो मोबदला देण्यासाठीही ‘सिद्धिविनायक’ संस्थेने पुढाकार घेतला आहे.