शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

५० ठिकाणी भरणार आठवडा बाजार!

By admin | Updated: September 5, 2016 04:35 IST

शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ५० आठवडा बाजार सुरू होणार

ठाणे : शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ५० आठवडा बाजार सुरू होणार असून शहरातील कोपरी परिसरात अशा स्वरूपाचा बाजार रविवारपासून सुरू झाला आहे. त्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला.जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत भाजीपाल्याच्या आठवडा बाजारास प्रारंभ होणार असून त्याविषयीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पणन तसेच जिल्हा पुरवठा विभागाला केल्या आहेत. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरीतील आठवडा बाजाराचे उद्घाटन झाले, त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह ठाण्याचे महापौर संजय मोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांची भाजी मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजारात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून एकनाथ शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात सर्वात जास्त आठवडा बाजार सुरू करून राज्यात एक आदर्श निर्माण करावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ठाणे जिल्हा प्रशासन आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कोपरीच्या संत तुकाराम महाराज क्र ीडांगण येथे आजपासून आठवडा बाजार सुरू करण्यात आला. वाजवी दरात थेट शेतातली भाजी मिळत असल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामध्ये महिलांचा समावेश जास्त होता. या बाजारात डहाणू येथील बारी शेतकरी गट, सेव्हन स्टार, तिवारपाडा, मुरबाड येथून स्वयंसहायता गट, याशिवाय नगर, राहुरी, नाशिकहून शेतकरी भाजी आणि फळे घेऊन आल्याचे आढळले. सध्या गावदेवी मैदान (शनिवार), हिरानंदानी सोसायटी (रविवार), ब्रह्मांड सोसायटी (मंगळवार), साकेतला (रविवार) आणि रविवारी कोपरी, असे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाच आठवडा बाजार सुरू झाले आहेत. ठाणे मनपाचे मैदान, वर्तकनगर, शिवाजी मैदान, तलावपाळी आणि ठाणे मनपा शाळा ४४, वर्तकनगर या ठिकाणीदेखील बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणीही लवकरच आठवडा बाजार सुरू करण्याचे नियोजन असल्याचे ठाणे उपजिल्हा निबंधक दिलीप उढाण आणि जिल्हा पणन व्यवस्थापक मोहन गंभीरराव यांनी सांगितले. या बाजारासाठी उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार किसान भदाणे, आत्माचे प्रकल्प संचालक पी.एम. चांदवडे, दीपक कुटे, ठाणे उपविभागीय कृषी अधिकारी अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.