शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये लागणार वेब कॅमेरे

By admin | Updated: October 13, 2016 06:46 IST

राज्यातील विविध कारागृहांत आता वेब कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने जेलमधील बंदी व कच्च्या कैद्यांचे अद्ययावत छायाचित्र

जमीर काझी / मुंबईराज्यातील विविध कारागृहांत आता वेब कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने जेलमधील बंदी व कच्च्या कैद्यांचे अद्ययावत छायाचित्र घेण्याबरोबरच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहातून पलायन केलेल्या किंवा पॅरोल, फर्लोच्या रजेवरून फरार झाल्यास त्यांना शोधण्यासाठी या शूटिंग आणि छायाचित्रांची पोलिसांना मदत होणार आहे. गेल्या काही महिन्यांत आॅर्थर रोड जेलसह राज्यातील विविध कारागृह व सबजेलमध्ये कैद्यांतील हाणामारी व आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. तसेच शिक्षा भोगत असलेले बंदी संचित (पॅरोल) व अभिवचन (फर्लो) मंजूर रजेवर बाहेर पडल्यानंतर पुन्हा जेलमध्ये परत न येता फरार होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी गृह विभागाकडून कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून वेब कॅमेऱ्यांची खरेदीदेखील केली जात असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.राज्यात मुंबई, ठाणे, तळोजा, येरवडा, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती व औरंगाबाद या ९ ठिकाणी मध्यवर्ती कारागृहे आहेत. त्याशिवाय १९ जिल्हा कारागृह वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची अनुक्रमे २३ व ३ कारागृहे आहेत. या ठिकाणी सिद्धदोष झालेले बंदी व कच्चे कैदी यांना गुन्ह्यांचे स्वरूप, गुन्हेगारांची पार्श्वभूमी याचा विचार करून ठेवले जाते. काही दिवसांच्या सुटीवर जेलमधून बाहेर गेल्यानंतर ते फरार होतात. त्यानंतर या कैद्यांच्या शोधासाठी नमूद संबंधित पोलीस घटक व ठाण्यांना ही माहिती पाठविली जाते. तेव्हा संबंधित फरारी कैद्याचे अलीकडच्या काळातील छायाचित्र नसल्यामुळे शोध घेण्याला मर्यादा येतात. त्यामुळे वेब कॅमेऱ्याद्वारे जेलमध्ये त्यांचे फोटो काढून ठेवले जातील. त्यानंतर फरारी कैद्यांच्या शोधासाठी ते संबंधित पोलीस ठाण्यांना पाठविले जाणार आहेत. विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेले कैदी तसेच न्यायालयीन कैद्यांची माहितीदेखील या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. वेब कॅमेऱ्यांसह स्पीकर, मायक्रोफोन, व्हीजीए केबलचीही खरेदी केली जाणार आहे. यासाठी निविदा प्रकिया सुरू करण्यात आलेली आहे. २० आॅक्टोबरला या निविदा उघडल्या जाणार आहेत.