शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन

By admin | Updated: February 18, 2017 04:27 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

नवी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत शुक्रवारी सांगितले़ राज्यात सरकार पडावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडणे हे जनतेच्या हिताचे नाही़ कोणत्याच आमदाराला मध्यावधी निवडणुका नकोत़ मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत़ त्यांच्यात निवडणुकीमुळे बिनसले आहे. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीनंतरही ते मुंबईत सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील़ मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत असल्याने विजय निश्चित असून उपमहापौर आरपीआयचा असणार आहे़, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़राज्य सरकारमधून शिवसेनेने बाहेर न पडता, आरोप-प्रत्यारोपाऐवजी विकासावर भर द्यावा. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरए योजना राबवणे गरजेचे आहे़ मात्र पात्र-अपात्रतेची नियमावली ठरवण्याच्या वादामुळे त्यास विलंब होत आहे, असे आठवले यांनी सांगितले़नोटाबंदीचा निर्णय घाईत झाला असला, तरी तो योग्यच आहे़ त्यामुळे गैरमार्गाने काहींच्या खिशात जाणारा पैसा शासनाच्या तिजोरीत जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले़ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे़ त्यांनी पराभव मान्य करून सरकारला चांगल्या कामात साथ द्यावी़, असा सल्ला आठवले यांनी दिला़भाजपावर जातीयवादाचे आरोप करून ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळातच सर्वाधिक जातीवाद झाला़, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) नोटाबंदीचे जनतेने केले स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे. सरकार आरक्षणाच्या बाजूने असून केवळ ‘सबका साथ हिंदूंचा विकास’ असे नाही तर ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपाचे धोरण आहे. जातीनिहाय आरक्षण रद्द करायचे असल्यास अगोदर जाती संपवण्याची गरज आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.