शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

मिलेंगी ये ‘दर’ से हमे सरफराजी

By admin | Updated: August 28, 2016 01:53 IST

हाजी अली दर्ग्यात यापुढे महिलांना प्रवेश मिळणार, असा महत्त्वपूर्ण निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या दर्ग्यात आता महिलांनाही जाता येणार आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.

- इरफान अली पिरजादे(प्रासंगिक)हाजी अली दर्ग्यात यापुढे महिलांना प्रवेश मिळणार, असा महत्त्वपूर्ण निकाल शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या दर्ग्यात आता महिलांनाही जाता येणार आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.आमच्या सांगली गावातून माझ्या आईचा फोन आला़ मोठ्या आनंदाने ती सांगत होती की, हाजीअली (र.अ.) दर्ग्यामध्ये आता महिलांना प्रवेश मिळणार, कोर्टाचा निर्णय आलाय़ अशा कितीतरी महिलांना आनंद देणारा न्यायालयाचा निर्णय, प्रथमत: अशा प्रकारची न्यायालयीन लढा देणाऱ्या भारतीय मुस्लीम महिला आंदोलन संघटनेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन.पाच-सहा वर्षांपूर्वी महिलांना दर्ग्यात जाण्यास मुभा होती, परंतु अचानक साक्षात्कार झालेल्या दर्ग्याच्या ट्रस्टींनी महिला प्रवेशबंदीचा वटहुकूम काढला़ अशा प्रकारच्या बुरसटलेल्या विचारांच्या व्यक्तींची निवड वेगवेगळ्या ट्रस्ट बोर्डावर आपल्या देशात पाहायला मिळते़, परंतु मुस्लीम समाजातील बोहरा व शिया जमातीमध्ये महिलांना त्यांच्या समाजाच्या दर्ग्यामध्ये प्रवेश आहे़ बोहरा समाजाच्या मशिदीमध्ये महिला-पुरुष एकाच मौलानांच्या मागे नमाज अदा करतात़हजसाठी काबा शरीफमध्ये महिला-पुरुष एकाच ठिकाणी प्रार्थना करतात. अशा सर्वोच्च ठिकाणी हा भेदभाव नाही़, तसेच ह़ मोहम्मद पैगंबर (स़अ़स़) यांच्या मजहारीमध्येसुद्धा महिला-पुरुषांना जियारत (दर्शन) घेता येते़ अमेरिका, युरोपमध्ये काही मशिदींमध्ये मुख्य प्रवेशद्वार हे महिलांसाठी आरक्षित आहे़ पुरुषांसाठी अन्य दरवाजा आहे़ भारतातील विविध मुस्लीम दर्गा ट्रस्ट व बोर्डस्चे मेंबर काही विशिष्ट विचारसारणीच्या आहारी आहेत़ त्यांच्या विकासाची किंवा नगण्याची कल्पना मुख्य प्रवाहाला अनुसरून नाही़ भारत व आजूबाजूच्या मुस्लीमबहुल देशांमध्ये ‘इस्लाम’च्या शिकवणीचा उपयोग राजकीय विकासासाठी व पर्यायाने काहीच लोकांच्या आर्थिक विकासासाठी केला जातोय़ याची उदाहरणे आपल्या समोर गेली काही वर्षे सातत्याने हाजीअली ट्रस्टच्या रूपाने दिसत आहेत़इस्लामच्या शिकवणीचा उपयोग सामाजिक विकासासाठी केलाय, असे आपल्याला दिसून येत नाही. किंबहुना, त्याचा वेग फारच कमी आहे़ ह. हाजीअली (ऱअ़) यांच्या संत मंडळींची समाजात जे कार्य करण्याची गती अशा ट्रस्टींनी किंवा बुरसटलेल्या मंडळींनी मिटवली आहे़ न्यायालयाच्या या निकालामुळे उङ्मेङ्मल्ल उ्र१ू’ी उङ्मीि ची चर्चा सुरू झाली पाहिजे़ मुस्लीम महिलांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या मुस्लीम सत्यशोधक समाज, भारतीय मुस्लीम महिला आंदोलन, मुस्लीम राष्ट्रीय संत यांनी एकत्र येऊन मुस्लीम महिला न्याय हक्कासाठी लढा देत राहणे ही काळाची हाक आहे़ हाजीअली (ऱअ़) यांच्यावरील खालील आळी या कामासाठी प्रेरणादायी ठरतील़खुदा आपने वलियोंसे होता है राजी,मिलेंगी ये ‘दर’ से हमे सरफराजीयहा दिल से मांगो ये हजी अली है, खुदा के वली है...

(लेखक मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक आहेत.)