शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही एक पाऊल पुढे आलो, तुम्हीही या - अमित शहांचे शिवसेनेला आवाहन

By admin | Updated: September 18, 2014 12:43 IST

भाजप एक पाऊल पुढे आला आहे, इतरांनीही एक पाऊल पुढे टाकावं आणि युतीचा तिढा मिटवून टाकावा' असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला केले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १८ - ' चर्चेसाठी भाजप एक पाऊल पुढे आला आहे, इतरांनीही एक पाऊल पुढे टाकावं आणि युतीचा तिढा मिटवून टाकावा' असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला केले आहे. तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आलेले शहा यांनी कोल्हापुरातील सभेत जागावाटपाबाबात हे सूचक वक्तव्य करत जागावाटप सन्मानपूर्वक व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुका अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या असतानाही भाजप-शिवसेनेमधील जागावाटपावरून असलेले मतभेद संपलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर शहा यांनी ' हा प्रश्न लवकर निकालात काढावा आणि एकत्र येऊन आघाडी सरकारला हटवावे,' असे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळववल्यानंतर भाजपला आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची घाई असून त्यासाठीच ते निम्म्या जागांच्या मागणीसाठी आग्रही आहेत. मात्र लोकसभेत भाजपाला तर विधानसभेत शिवसेनेला अधिक जागा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे असलेले सूत्र शिवसेना बदलण्यास तयार नाही. यामुळेच भाजप नेते नाराज असून गरज पडल्यास स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून हा पेच वाढतच चालला असून शहा यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. 
या सभेदरम्यान शहा यांनी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. 'काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राचे वाटोळं केलं. एकेकाळी सर्व बाबतीत पुढे असलेला महाराष्ट्र आता पिछाडीवर पडला आहे, राज्यात अनेक घोटाळे झाले, मात्र त्याच्या चौकशीचे फक्त नाटक होते, ' असे ते म्हणाले. शरद पवारांनी राजकारणाचे व्यापारीकरण केले, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली. आघाडी सरकारमुळे तिजोरीत खणखणाट झाला असून आता महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकजूट होऊन सरकार बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, सर्वांनी संघर्षासाठी तयार रहा आणि आघाडी सरकारला उखडून फेका, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.