शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही

By admin | Updated: October 5, 2014 02:10 IST

आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़

प्रश्न : आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़
उत्तर : भाजपा-शिवसेना युती तुटली़ शिवसेना बाहेर पडली, आम्ही हा निर्णय अनिच्छेने का होईना आता मान्य केला आह़े एका विशिष्ट अंकाभोवती महायुतीच्या जागावाटपाची चर्चा फिरत होती. शिवसेना 151 जागांचा आग्रह सोडायला तयार नव्हती; तर आमची 13क् पेक्षा कमी जागा घेण्याची तयारी नव्हती़ उमेदवारी अर्ज भरायला केवळ 24 तासांचा अवधी शिल्लक होता़ वेळ कमी होता. त्यामुळे चर्चा आणखी पुढे रेटता येणोही शक्य नव्हत़े सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि शिवसंग्राम अशा घटक पक्षांना वा:यावर सोडून जाणो बरोबर नाही, असे आमचे मत पडले. भाजपा 255 जागा आपल्या चिन्हावर लढवणार आह,े तर उर्वरित 33 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत़ पंचरंगी लढत होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाकडे आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़
प्रश्न : तुमचे स्वत:चे सव्रेक्षण काय म्हणते?
रुडी : कुठल्याही सव्रेक्षणाबाबत मला ठाऊक नाही़ मी कुठल्याही सव्रेक्षणावरून ठोकताळे बांधत  नाही़ पण महाराष्ट्रातील जनतेला यावेळी राज्यात एका पक्षाचे स्थिर आणि सक्षम सरकार हवे आह़े 
प्रश्न : आपल्या पक्षाचा मुद्दा काय?
रुडी : गत 15 वर्षातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचार हा आमचा प्रमुख निवडणूक मुद्दा आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख सरकार देऊ इच्छितो आणि महाराष्ट्रातील जनता योग्य भाजपाच्या रूपातील सक्षम पर्याय निवडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो़
प्रश्न : शिवसेनेने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. परंतु तुम्ही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांना का स्वीकारले नाही?
रुडी : हे संपूर्णपणो निराधार आहे. शिवसेनेसोबत झालेल्या आमच्या कोणत्याही बैठकीमध्ये  मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत कधी चर्चा झाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
 
महाराष्ट्रात भाजपा स्पष्ट बहुमत मिळवून स्वबळावर आपले सरकार स्थापन करणार असा आमचा दृढविश्वास आहे. आम्हाला सरकार स्थापण्यासाठी या किंवा त्या बाजूच्या आघाडीतील कोणत्याही पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही. 
 
सर्वत्र पंचरंगी लढती होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाच्या बाजूने आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् चा आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़