गणेश चोडणेकर,आगरदांडा- शेत शिवारासह नागमोडी वाट असो किंवा सपाट-सखल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता अगदी दुर्मीळ झाले आहे. शेती व्यवसाय हद्दपार होऊ लागल्याने बैलगाडी देखील इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.प्राचीन काळात राजवटीत रथ होता. तेव्हापासून शेतकऱ्यांचे शेतीशी निगडित असे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. घरापुढे बैलगाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. पूर्वी रस्त्यांचा विकास झालेला नव्हता. बैलगाडी हे त्यावेळी दळणवळणाचे प्रमुख साधन होते. त्यामुळे बैलगाडीला फार महत्त्वाचे स्थान होते. बैलगाडीतूनच नवरदेवाची वरात काढली जात असे, तसेच देवदेवतांची मिरवणूक काढली जात असे. लाकडाची सुबक, दणकट कलाकुसर करून बैलगाडी बनविण्याचे काम सुतार करीत असत. या बैलगाडीसाठी लागणारी चाके व तुब सागाच्या लाकडापासून बनविली जात, ही तुब काढण्यासाठी आतासारखे यंत्र नव्हते. ती हाताच्या कलाकुसरीने तयार केली जात असे. बैलगाडी बनविण्यासाठी १० ते १२ हजार रु पये खर्च होत होते. यामधून कारागिरास मजुरी मिळायची मात्र साधनसामग्रीचा विकास होत गेला. विजेवर चालणारे वेल्डिंग मशीन आल्यामुळे लाकडी बैलगाडीची जागा लोखंडी बैलगाडीने घेतली. त्यामुळे लोखंडी बैलगाडी बनविण्याचे कारखाने विकसित झाले.त्यामुळे आयती लोखंडी बैलगाडी मिळू लागल्याने लाकडी बैलगाडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. विज्ञानाचा जसा जसा विकास होत गेला डोंगर-दऱ्यातून पक्के रस्ते तयार झाले दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ झाली. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा टेम्पो, व इतर मालवाहतूक साधने आली. याच्या मदतीने जलद वाहतूक होऊ लागली, शेतीचे कामेही जलद गतीने होऊ लागल्याने वेळेची बचत झाली. शेतमाल ट्रॅक्टरने व रिक्षा टेम्पोने बाजारात जाऊ लागल्याने बैलगाडीची गरज कमी झाली. मुरु ड तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बैलगाड्या शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पुस्तकात बैलगाडी बघायला मिळेल, असे वाटू लागले आहे.>तेलवडे येथील शेतकरी कृष्णाम्हात्रे म्हणाले की, आपल्या देशाचा विकास होत आहे. हे खरे असले तरी जुन्या गोष्टी विसरता कामा नये, शेतीचे काम संपल्यानंतर बैलगाडीतून पेंडा भरला जायचा, मात्र आता रिक्षा टेम्पो व इतर चारचाकी वाहनांमधून विक्र ीसाठी नेत असत तसेच मुरु ड तालुक्यात शेतकरी कमी राहिले आहेत. आताच्या तरु णांना शेती करायला आवडत नाही, शेती व्यवसाय कमी झाल्याने बैलगाडीचे महत्त्व कमी झाले आहे.
बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: March 6, 2017 03:18 IST