शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य लॉटरीची नाताळ सोडत रद्द होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 29, 2015 23:58 IST

राज्यात एकाही तिकिटाची विक्री नाही; शासनाचा आदेश भोवला.

राजेश शेगोकार/बुलडाणा : महाराष्ट्र राज्य लॉटरीने गेल्या ४५ वर्षांपासून या क्षेत्रातील आव्हाने पेलत आपले वेगळेपण कायम ठेवले आहे; मात्र या लॉटरीच्या इतिहासात पहिल्यांदाच नाताळ न्यू ईयर सोडतचा ड्रॉ रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या सोडतीसाठी छापण्यात आलेल्या तिकीटाच्या खरेदीसाठी राज्य शासनाने नवी बंधनं टाकल्यामुळे राज्यातील एकाही विक्रेत्याने तिकिटाची उचल केली नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या अल्पबचत संचालनालयाच्या वतिने महाराष्ट्र राज्य लॉटरीची सोडत नियमित स्वरूपात, तसेच विविध सण उत्सवाच्या निमित्ताने निघत असते. नाताळ न्यू ईयर सोडतीचेही दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षीसुद्धा ५ जानेवारीला नाताळ न्यू ईयर सोडत काढली जाणार होती. त्यासाठी अल्पबचत संचालनालयाच्या वतिने ४ लाख तिकिटे छापण्यात आली; मात्र या तिकीटाच्या विक्रीबाबत २४ नोव्हेंबर रोजी वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाचे कक्षाधिकारी माधव आव्हाड यांच्या सहीने अध्यादेश प्रकाशीत करण्यात आला. या अध्यादेशामध्ये लॉटरी विक्रेत्यांना किमान ५ हजार तिकिटे खरेदी करण्याचे बंधन टाकण्यात आले. यासोबतच विक्रेत्यांना मिळणार्‍या कमीशनबाबतही नव्याने नियम घोषित करण्यात आले. पूर्वी ५00 पासून ४९ हजार ९९९ तिकीटांच्या खरेदीवर विक्रेत्यांना २0 टक्के कमीशन दिले जात होते. २४ नोव्हेंबर रोजीच्या अध्यादेशानुसार त्यात बदल करून ५ हजार ते १ लाख तिकिटांच्या खरेदीवर २0 टक्के कमीशन ठेवण्यात आले. शंभर रूपये किमतीच्या ५00 तिकिटांची खरेदी करणार्‍या सामान्य विक्रेत्यावर किमान ५ हजार तिकिटांची खरेदी करणे बंधनकारक झाल्याने ही बाब त्यांना आर्थिकदृष्टया परवडणारी नव्हती. त्यामुळे एकाही विक्रेत्याने तिकिटांची उचल केली नाही. विशेष म्हणजे, मुंबईतील सर्वात मोठी एजन्सी एकाच वेळी ३ लाखापेक्षा जास्त तिकिटांची खरेदी करून राज्यभरातील किरकोळ विक्रेत्यांना कमीशनचा एक टक्का वाढवून विक्री करीत असते. शासनाच्या नवीन धोरणामुळे मुंबईतील या एजन्सीनेही तिकिटांची उचल केली नसल्याने नाताळ न्यू ईयर सोडतीची सर्व तिकिटे पडून आहेत. त्यामुळे राज्य शासनावर ड्रॉ रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

*५ हजार तिकीटे विकली गेली असती, तरी शासनाला तोटाच!

वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाच्या अध्यादेशानुसार, एखाद्या विक्रेत्याने ५ हजार तिकीटे घेतली असती तरी त्यावर कमीशन वजा जाता ४ लाख रूपये अल्पबचत लॉटरी संचालनालयाला मिळाले असते; मात्र लॉटरी तिकिट विक्रीच्या करापोटी शासनाकडे तब्बल १२ लाख रूपये अल्पबचत संचालनालयाला भरावे लागले असते. वित्त विभागाच्या नियमानुसार पांरपरीक साप्ताहीक लॉटरीच्या प्रत्येक सोडतीला ६0 हजार, पंधरवडयातून निघणार्‍या सोडतीला १ लाख २५ हजार, मासिक सोडतीला २ लाख ५0 हजार, तर फेस्टीवल सोडतीला तब्बल १२ लाखाचा कर भरावा लागतो. त्यामुळे ५ हजार तिकिटे विकली गेली असती, तरी अल्पबचत लॉटरी संचालनालयाला तोटाच झाला असता.

*साप्ताहीक सोडतही रद्द झाल्याने दूहेरी तोटा

सण उत्सवाच्या निमित्ताने निघणारी विशेष सोडत मंगळवारी असेल, तर त्या दिवशी निघणारी साप्ताहीक सोडत रद्द केली जाते. या नियमानुसार ५ जानेवारी रोजी मंगळवार असून, त्यादिवशी नाताळ न्यू ईयर सोडत निघणार असल्याने साप्ताहीक सोडत रद्द करण्यात आली आहे; मात्र एकही तिकिट विकले गेले नसल्यामुळे नाताळ सोडत रद्द होण्याच्या मार्गावर असून, आता साप्ताहीक सोडतही निघणार नसल्याने शासनाचा दूहेरी तोटा झाला आहे.