शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वॅक्स म्युझियममध्ये 'सैराट'चा फिव्हर, आर्ची-परशाचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 12:35 IST

सैराट सिनेमातील आर्ची, परश्याची क्रेज अद्यापही कायम असून भारतातील पहिले मेणाचे संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये त्यांच्या मेणाच्या पुतळ्याचा समावेश होणार आहे.

विशाल विकारी
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १२ -  सैराट सिनेमातील आर्ची, परश्याची क्रेज अद्यापही कायम असून  भारतातील पहिले मेणाचे संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम मध्ये आर्ची, परश्या व नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे तयार करण्यात येणार आहे. या संग्रहालयातील वँक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी या कलाकारांचे मोजमाप घेतले असून येत्या दोन महिन्यात हे मेणाचे पुतळे तयार होतील अशी माहिती कलावंत सुनिल कंडलूर व संचालक सुभाष कंडलूर यांनी दिली. 
 
(मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये दाखल होणार नरेंद्र मोदींचा पुतळा)
 
सैराट सिनेमाच्या यशानंतर सध्या आर्ची, परश्यांची क्रेज सर्वत्र वाढली आहे. त्यांना पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सैराट झाली आहे, अशा कलावंताचे पुतळे संग्रहालयात उभारण्याचा चंग सुनिल कंडलूर यांनी बांधला व कमीत कमी कालावधीत या कलावंतानी देखिल याकरिता सहमती दर्शविल्याने पुतळे बनविण्याचे काम हाती घेण्यात आले असुन यातील पहिली पायरी असलेले कलावंताचे मोजमाप घेण्याचे काम पुर्ण झाले आहे. आर्ची (रिंकू राजगुरु), परश्या (आकाश ठोसर) व नागराज मंजुळे यांच्या हस्तेच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सुभाष कंडलूर यांनी सांगितले. सध्या सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये अनेक क्रांतीकारक, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, अभिनेते, अभिनेत्री यांचे जवळपास शंभर मेणाचे पुतळे असून रविना टंडन, सोनू सुत, जँकलिन, प्रकाशराज, श्रेया शरण, मि. वर्ल्ड अनुप सिंग ठाकूर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, थोर समाजसुधारण ज्योतिबा फुले यांचे मेणाचे पुतळे बनविण्याचे काम सुरु आहे.