शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत शोध, नियोजनासाठी ‘वॉटस्कॅन’

By admin | Updated: May 27, 2016 01:45 IST

भूगर्भातील पाणीसाठ्याचा शोध आणि त्याच्या नियोजनासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या मशीनचा उपयोग केला जाणार आहे.

मुंबई : भूगर्भातील पाणीसाठ्याचा शोध आणि त्याच्या नियोजनासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या मशीनचा उपयोग केला जाणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये या मशीनचा वापर केला जाणार असून टंचाई निवारणासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवनात विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सीआयआयच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ व मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि लातूर या एकूण दहा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची निवड करुन या भागात जलस्त्रोतांचा शोध, पाण्याची साठवणूक आणि नियोजन करण्यासाठी सीआयआयने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिनचा वापर सुरु करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जलसंपदा विभागातील अधिका-यांनी सीआयआयच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या मशीनच्या माध्यमातून जमीनीत कोणत्या ठिकाणी पाणी जमा होतो व कोणत्या ठिकाणी साठवणूक करावयाची आहे याची माहिती मिळते. (प्रतिनिधी)राष्ट्रीय ग्रामविकास संस्था उभारणार - मुख्यमंत्रीऔरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली असून संस्थेच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन विद्यापीठात ही संस्था स्थापन करण्यात येईल, असे ते म्हणाले. या संस्थेमार्फत ग्रामीण विकासाकरीता संशोधन, विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील. कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार असून तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रम चालविले जातील.