शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स, मॉलमध्ये पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: May 1, 2016 01:33 IST

गेल्या तीन दिवसांपासून टँकर असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका शनिवारी मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि मॉल्समध्ये जाणवला. पाण्याअभावी अनेक हॉटेल्सनी जेवण बंद करत

- मनोज गडनीस,  मुंबईगेल्या तीन दिवसांपासून टँकर असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका शनिवारी मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि मॉल्समध्ये जाणवला. पाण्याअभावी अनेक हॉटेल्सनी जेवण बंद करत ग्राहकांना केवळ सॅन्डविच अथवा तत्सम खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात केली होती. केवळ हॉटेलच नव्हे तर शॉपिंग आणि सिनेमासाठी मॉलमध्ये येणाऱ्या हजारो ग्राहकांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाले. शनिवारी रात्री उशिरा हा संप मागे घेण्यात आला असून त्यानंतर काही तासांत सर्व पाणी पुरवठा पूर्ववत होईल असा दावा टँकर असोसिएशनने केला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने या अनुषंगाने पॅलेडियम मॉलला (हायस्ट्रीट फिनिक्स) भेट दिली असता तिथे शनिवारी थेंबभरही पाणी आले नसल्याचे दिसून आले. येथील अनेक हॉटेल्सही तूर्तास ग्राहकांना पूर्ण जेवण देणे बंद केले होते. जेवण बनविण्याकरिता जास्त पाण्याची आवश्यकता भासत असल्यामुळे अनेकांनी जेवणाऐवजी सॅन्डविच अथवा तत्सम खाद्यपदार्थच देण्यास सुरुवात केली होती. येथील काही हॉटेल मॅनेजरनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मॉलमध्ये पाणी कमी दवाबाने येत होते. परंतु, शनिवारी दिवसभर मॉलमध्ये पाणीच आले नाही. परिणामी, उन्हाळ््याची सुट्टी आणि वीकेन्ड अशा दुहेरी मुहुर्तावर इथे आलेल्या ग्राहकांचे हाल झाले. या संदर्भात फिनिक्समिलच्या प्रतिनिधीला विचारणा केली असता त्याने पाण्याची समस्या असल्याचे मान्य केले. मात्र तांत्रिक काम आणि टँकरची समस्या असल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले. मुंबई शहरातील सर्व हॉटेल्स आणि मॉलमध्ये मिळून दिवसाला २०० पेक्षा जास्त टँकर लागतात. आठवड्याच्या अंती या संख्येत वाढही होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून या संपामुळे स्थिती भीषण झाली होती. (प्रतिनिधी)मुंबई महानगरपालिकेने अनेक टँकरवरील पम्प सील केल्याच्या कारवाईच्या विरोधात आम्ही संप पुकारला होता. चर्चेअंती आम्ही आता संप मागे घेतला आहे. शनिवारी रात्रीपासून टँकर पुन्हा रस्त्यावर येतील आणि पुढच्या काही तासांत स्थिती सामान्य होईल.- जीतू शहा, निमंत्रक, टँकर असोसिएशन