शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांना पाणी पुरवा अन्यथा दिघी बंदर बंद करा - हायकोर्ट

By admin | Updated: April 8, 2017 05:11 IST

दिघी बंदर व्यवस्थापनाने बंदराचे वाढीव बांधकाम करताना, आजूबाजूच्या चार गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले

मुंबई : दिघी बंदर व्यवस्थापनाने बंदराचे वाढीव बांधकाम करताना, आजूबाजूच्या चार गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. ५ वर्षे उलटूनही या आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्याने, उच्च न्यायालयाने दिघी बंदर व्यवस्थापनाला आज चांगलेच खडसावले. गावकऱ्यांना दररोज १०० टँकरने पाणी पुरवा अन्यथा बंदर बंद करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिघी बंदर व्यवस्थापनाला शुक्रवारी दिले. २०११ मध्ये दिघी बंदराचे वाढीव बांधकाम करताना, व्यवस्थापनाने दिघी, नानवली, सावर्डेकर, मणेरी आदी गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार, काही दिवस दिघी बंदर व्यवस्थापनाने गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करूनही दिल्या. मात्र, दिघीजवळ असलेल्या कुडकी गावाने पाणी देण्यास नकार दिल्याची सबब पुढे करत, व्यवस्थापनाने संबंधित गावांना टँकरने पाणी पुरवण्यास नकार दिला. याविरुद्ध दिघीच्या काही रहिवाशांनी अ‍ॅड. आर. मेंदाडकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.बंदर व्यवस्थापनाच्या वकिलांनी पाणीच उपलब्ध नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. पाणी उपलब्ध नसतानाही काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, १०० टँकरने पाणी पुरवणे शक्य नसल्याचे व्यवस्थापनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले, पण उच्च न्यायालयाने व्यवस्थापनाचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला. ‘गावकऱ्यांना तातडीने पाणी पुरवा अन्यथा बंदराचे कामकाज बंद करा,’ असे निर्देश उच्च न्यायालयाने व्यवस्थापना दिले. (प्रतिनिधी)