शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सासवडला जुलैअखेरपर्यंत पाणी

By admin | Updated: May 21, 2016 01:12 IST

जुलै महिनाअखेर पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा वीर जलाशयात शिल्लक असल्याने सासवडकरांना पाणीटंचाई भासणार नाही

सासवड : जुलै महिनाअखेर पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा वीर जलाशयात शिल्लक असल्याने सासवडकरांना पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप व पाणीपुरवठा सभापती सुहास लांडगे यांनी दिली. वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्षांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा समितीचे सभापती सुहास लांडगे, नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, पाणी विभागाचे ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. वीर धरणात सध्या अंदाजे दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. सासवडच्या पाणीपुरवठा योजनेच्या चारीमध्ये १० फुट पाणी आहे; त्यामुळे पाणी कमी पडणार नाही. जर धरणाच्या कालव्यातून पाणी सोडले व योजनेच्या चारीखाली पाणी गेले, तर पाणी जॅकवेलमध्ये आणण्यासाठी पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सध्या केवळ वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास व या भागात वादळ झाल्याने वीजपुरवठा खंडित न झाल्यास पाणी पुरवठ्यात अडथला जाणवणार नाही. वीजपुरवठा खंडित झाला तर मात्र थोडी अडचण होऊ शकते. त्यामुळे आवश्यक असणारे पाणी पंपिंग करून दोन दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा व्यवस्थित पार पडेल, असे नियोजन केले असल्याची माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सुहास बापू लांडगे यांनी दिली. सासवड शहरास रोज ५५ ते ६० लाख लिटर पाण्याची गरज लक्षात घेऊन वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेली योजना सलग दोन दिवस पाणी उचलून साठवण टाक्यात ठेवले जाते. सकाळी-रात्री अशा दोन वेळेत बंद नळाद्वारे पाणी देण्यात येते. सासवड शहराला गराडे, घोरवडी व वीर धरणांतून पाणीपुरवठा होत होता. परंतु, तालुक्यातील टंचाईची परीस्थित लक्षात घेत व या जलाशयावर असणाऱ्या इतर गावांच्या पाणी योजनेसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून गराडे व घोरवडीतील पाणी सासवडला देणे बंद आहे. (वार्ताहर)