शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदामंत्र्यांची मोटार रोखली

By admin | Updated: November 22, 2015 04:14 IST

गंगापूर आणि दारणा धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उदे्रकाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी सामोरे जावे लागले.

नाशिक : गंगापूर आणि दारणा धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उदे्रकाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले; तसेच जोरदार घोषणाबाजी करत वाहन कार्यालयाबाहेर रोखले आणि त्यावर चढण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांवर लाठीमार करून पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले.काँग्रेस, सेना, राष्ट्रवादीचे आंदोलनमराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी दारणा, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यापासून शहरासह जिल्ह्यात पाणीप्रश्न ‘पेटला’ आहे. शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी महाजन उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांसह काँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाजन यांच्या निषेधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळपासूनच मोठ्या संख्येने एकत्र आले होते. दुपारी २च्या सुमारास पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी ताफ्यातील महाजन यांच्या वाहनाला घेराव घातला.