शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

४८६ गावांना ६५४ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: October 16, 2015 03:53 IST

पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू

संतोष वानखडे, वाशिम पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. राज्यातील ४८६ गावांसाठी अद्यापही ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दफ्तरी आहे.गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने, पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढत आहे. यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, पावसाळ्यातच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. सप्टेंबरच्या पंधरवाड्यात परतीचा पाऊस झाल्याने, मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची सरासरी बऱ्यापैकी भरून निघाली. या पावसाने टँकरची संख्या कमी केली. आॅगस्टपर्यंत १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली होती. आता ही संख्या ४८६ वर आली. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १२ आॅक्टोबर २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात ४८६ गावांत ६५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये १३६ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा ४९ होता. या वर्षी अल्प पाऊस झाल्याने अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे ३१९ गावांत ४४९ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण, अमरावती विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. नाशिक विभागातील १०४ गावांमध्ये १३० टँकर, पुणे विभागातील ६३ गावांमध्ये ७५ टँकर व औरंगाबाद विभागात ३१९ गावांत ४४९ टँकर असे एकूण ४८६ गावांमध्ये ६५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.