शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला पाणीटंचाई : आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणार

By admin | Updated: July 5, 2016 20:51 IST

पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

आषाढी यात्रेसाठी उजनीतून पाणी सोडणारसोलापूरला पाणीटंचाई: महापालिका दीड कोटी पाणीपट्टी भरणारसोलापूर : पंढरपूरला आषाढी यात्रेनिमित्त होणारी वारकऱ्यांची गर्दी व सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मंत्रालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या संभाव्य पाणी टंचाईबाबत बैठक घेतली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम उपस्थित होते. याचवेळी सोलापुरात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी उजनीतून भीमेत पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अभियंता चौगुले, मनपा पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता राजकुमार रेड्डी उपस्थित होते. औज बंधाऱ्यात १२ दिवस पुरेल इतपत पाणीसाठा आहे. या काळात पाऊस न पडल्यास सोलापूरच्या पाणी पुरवठयाची स्थिती बिकट होणार आहे. संभाव्य पाणीटंचाई ओळखून उजनीतून भीमेत पाणी सोडणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेला दीड कोटी भरावे लागतील असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने दिला. याबाबत पालकमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. १५ जुलैनंतर होणारी पाणीटंचाई ओळखून महापालिका दोन दिवसात दीड कोटी भरेल असे आयुक्त काळम यांनी सांगितले. आषाढी यात्रेसाठी पाटबंधारे खात्यातर्फे भीमेत पाणी सोडण्यात येणार आहे. याबरोबरच सोलापूरसाठी जादा पाणी सोडण्यात येईल. यातून औज व चिंचपूर बंधारा साडेचार मीटर क्षमतेने भरून दिला जाईल. यातून सोलापूरची पुढील दोन महिन्याची पाण्याची चिंता मिटेल. उजनी धरणात सध्या वजा ५३ पाणीसाठा आहे. पुण्यात पावसाने पाणीपातळीत एक टक्का वाढ झाली आहे. आषाढीसाठी पाणी सोडल्यास पुन्हा मूळ पातळीवर पाणी जाणार आहे. त्यामुळे पुणे व धरण परिसरात पावसाची नितांत गरज आहे. दुबार पंपिंग सुरूचउजनी जलवाहिनीतून दुबार पंपिंग करून सोलापूरला पाणी आणले जात आहे. यंदा पावसाला विलंब झाल्याने दुबार पंपिंगचे वेळापत्रक वाढले आहे. याचबरोबर पाणी पुरवठा विभागाने मागीलवेळेस सोडलेले पाणी काटकसरीने वापरले आहे. औज बंधाऱ्यात पाणी अडविल्यावर पाठीमागे १२ किलोमीटर पाणी थांबते. यातून कर्नाटकाचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करतात. त्यामुळे यावेळेस चिंचपूर बंधारा रिकामा होईल तसे औज बंधाऱ्यातील पाणी वेगाने रिकामे करण्यात आल्याने जास्त दिवस पाणी पुरले आहे.