शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

अपार्टमेंट्समध्ये पाणीबचतीची मोहीम

By admin | Updated: May 17, 2016 05:50 IST

‘लोकमत’चे जलमित्र अभियान उपक्रमाच्या वृत्तांची दखल घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीबचतीसंदर्भात जागरूकता निर्माण होत

मुंबई : ‘लोकमत’चे जलमित्र अभियान उपक्रमाच्या वृत्तांची दखल घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीबचतीसंदर्भात जागरूकता निर्माण होत असून, अपार्टमेंट्स, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी वाचविण्याची जणू मोहीमच सुरू झालेली आहे. वाहनधारक आपली वाहने सप्ताहात एकदा किंवा दोनदा केवळ बादलीभर पाण्याचा वापर करून स्वच्छ करीत आहेत; तर घराघरामध्येही पाण्याचा कमीतकमी उपयोग करून कामे उरकली जात आहेत.कोल्हापूर येथील प्रतिभा नगरमधील ‘यश इलिट’च्या सदनिकाधारकांनी दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाआड बादलीतून पाणी घेऊन चारचाकी आणि दुचाकी वाहने धुण्याचा निर्णय घेतला. या सामुदायिक निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. यामुळे पाइपद्वारे वाहने धुण्यामुळे होणारा पाण्याचा बेसुमार अपव्यय टळला आहे. सरासरी ५० टक्के पाण्याची बचत होत आहेसातारा येथे गृहिणींनी पाणीबचतीसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सिंक, बेसिनच्या पाइपची ड्रेनेजला असलेली जोडणी काढून तेथून भाजी किंवा तांब्या-पेले विसळलेले पाणी बादलीत साठवून त्याचा उपयोग गृहनिर्माण सोसायटीमधील बागेला पाणी देण्यासाठी करण्यात येत आहे. नंदा पिसाळ या गृहिणीने त्या करीत असलेला उपाय सांगितला. त्या म्हणाल्या की, घरातील टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये ५ लीटर पाणी बसते. बटण दाबले की सर्व पाणी वाहून जाते. आम्ही टँकमध्ये १ लीटरची प्लॅस्टिकची बाटली ठेवली आहे. त्यामुळे टँकमधील जागा कमी झाल्यामुळे ४ लीटर पाणी बसते आणि १ लीटरची बचत होत आहे.सोलापुरातील होटगी रोड आणि विजापूर रोडवरील अनेक अपार्टमेंट्समध्येही पाणीबचतीसाठी अनेक उपाययोजना केल्याचे दिसून आले. या ठिकाणी घरेलू कामगारांना केवळ एका बादलीत भांडी धुण्याची सूचना दिली आहे. अनेक गृहिणींनी दररोज टॉवेल धुण्यासाठी देण्याचे बंद केल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)वॉटरबॅगेतील पाण्याचे संकलनडॉ. शीतल पाटील फाउंडेशनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे पारस प्ले अ‍ॅँड प्री-प्रायमरी स्कूल चालविले जाते. शाळेत ५० विद्यार्थी आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनाही पाणीबचतीचे धडे दिले आहेत. शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅगमधील शिल्लक पाणी एकत्र संकलित करण्याची व्यवस्था दोन महिन्यांपासून केली आहे. अशा प्रकारे संकलित झालेल्या पाण्यातून शाळेतील फरशांची स्वच्छता केली जाते किंवा झाडांना वापरले जात आहे.